पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौरा | तळवडे ते देहूगाव दरम्यानच्या रस्त्यांवर 'ट्रॅफिक जॅम'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:31 PM2022-06-14T12:31:11+5:302022-06-14T12:34:05+5:30
सकाळपासून प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी...
पिंपरी: श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. दुपारी दोन तास पंतप्रधान देहूत असणार आहे. पंतप्रधानांच्या देहू दौऱ्यामुळे गावात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व रस्त्यांची वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच सकाळपासून प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
पुणे-मुंबई महामार्गावरील देहू फाटा ते देहू रोड फाटा ते देऊळगाव दरम्यानचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. वारकऱ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी निगडी रुपीनगर तळवडे, तसेच आळंदीकडून मोशी, चिखली तळवडे मार्गे रस्ता खुला ठेवला होता. आज सकाळी १० वाजल्यापासून तळवडेपासून ते विठ्ठलवाडी पेट्रोल पंपापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आले.
भर उन्हात वारकऱ्याचा पायी प्रवास
विठ्ठलवाडीच्या अलीकडे वाहनतळाची निर्मिती करण्यात आलेली असून सभेसाठी आलेल्या नागरिकांना वारकऱ्यांना कार्यक्रम तळापासून अलीकडेच वाहने लावे लागत आहे. त्यानंतर तेथून सभास्थानाकडे जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच वाहनतळाच्या शेजारी शेजारी वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्थाही आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कडेकोट बंदोबस्त
पंतप्रधान देहूत येत असल्याने आज सकाळपासूनच सकाळपासूनच देहूतील सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तळवडे मार्गे देहू गावात वारकऱ्यांना येण्याची सोय करण्यात आली आहे. या रस्त्यावरही कॅपजेमिनी चौक तसेच विठ्ठलवाडी चा अलीकडील चौकामध्ये बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. या ठिकाणी वाहनांना अडवण्यात येत होते.
स्थानिकांची झाली अडचण
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे देहू गावात येणाऱ्या नागरिकांची नागरिकांची तसेच स्थानिक नागरिकांची गैरसोय झाल्याचे दिसून आले. तळवडेकडील केपजेमिनी चौका पासूनच नागरिकांना अडविण्यात येत होते. त्यामुळे विठ्ठलवाडी तळवडे काळोखे मळा या परिसरात राहणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी दहा वाजल्यापासूनच दुपारी तीन वाजेपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.