पंतप्रधान नरेंद्र मोदी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देणार तणावमुक्तीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:53 PM2018-02-09T13:53:58+5:302018-02-09T13:58:01+5:30
दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या विद्यार्थ्यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तणावमुक्तीचे धडे देणार आहेत. येत्या १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत ते राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधारणार आहेत.
पुणे : दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या विद्यार्थ्यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तणावमुक्तीचे धडे देणार आहेत. येत्या १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत ते राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधारणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्याचबरोबर आता ते थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याचे प्रसारण दूरदर्शन, डीडी न्यूज, डीडी इंडिया या चॅनेलबरोबरच आॅल इंडिया रेडिओ, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचे यूट्यूब चॅनेल, माय गव्हर्न्मेंटवरून फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून केले जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांना हे भाषण दाखविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी शाळांनी प्रोजेक्टर, टीव्ही किंवा मोठ्या पडद्यावर दाखविण्याची सोय करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.