पुणे दौऱ्यात मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी 'एसपीजी'वर; 'या' विशेष विमानाने होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 09:58 AM2020-11-28T09:58:01+5:302020-11-28T12:31:36+5:30

देशातील कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

Prime Minister Narendra Modi will visit Pune today | पुणे दौऱ्यात मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी 'एसपीजी'वर; 'या' विशेष विमानाने होणार दाखल

पुणे दौऱ्यात मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी 'एसपीजी'वर; 'या' विशेष विमानाने होणार दाखल

Next

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला ते भेट देणार असून कोरोना विषाणूवरील लसीची ते माहिती घेणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे पोलिसांसह विशेष सुरक्षा दलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. पंतप्रधानांच्या प्रवासाठी नुकतेच बोईंग ७७७ ही दोन विमाने दाखल झाली असून त्यांचे नामकरण 'एअर इंडिया वन'असे करण्यात आले आहे. या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

देशातील कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत १०० देशांचे राजदूत असल्याने या दौऱ्याला मोठे महत्व आहे. दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदी हे लोहगाव विमानतळ येथे येणार असून त्यानंतर ते हेलिकॅाप्टरने 'सिरम'मध्ये जाणार आहे. या  काळात पुणे पोलीस आणि विशेष सुरक्षा बलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील मोठ्या पदावरील महत्वांच्या व्यक्तींसाठी विशेष सुरक्षा दलांची आवश्यकता जाणवू लागली. त्यानंतर या बलाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. १८ फेब्रुवारी १९८५ ला केंद्रीय गृह मंत्रालयाने या साठी बिरबलनाथ समितीची स्स्थापना केली. या समितीने स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या स्थापनेचा प्रस्ताव दिला. ३० माचर्च १९८५ ला राष्ट्रपतींनी कॅबिनेट सचिवालयाला याची मान्यता देत या साठी ८१९ पदांच्या निर्मितीला मंजुरी दिली. त्यानंतर २ जुन १९८८ ला भारतीय संसदेच्या एका अधिनिय मानुसार स्पेशल प्रोटेक्क्शन ग्रुपची (एसपीजी) स्थापना झाली.

 कुठल्याही प्रकारच्या हल्यापासून पंतप्रधानांची सुरक्षा करण्यास सक्षम-

'एसपीजी'मध्ये असलेले स्पेशल कमांडो हे पंतप्रधानांचे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सक्षम असतात. त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. सर्व प्रकारची आधुनिक हत्यारे, आधुनिक गाड्यांचा ताफा या बलांकडे असतो. आण्विक हल्ल्यापासूनही बचावासाठीही या दलातील जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.  डायरेक्टर जनरल दर्जाचा आयपीएस अधिकारी या दलाचा प्रमुख असतो. त्याचे कार्यालय दिल्ली येथील पंतप्रधान निवास स्स्थानात आहे.
 
राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या प्रवासाठी आता एअर इंडिया वन-

देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या देशातील तसेच परदेशाच्या प्रवासाठी बोईंग ७७७ ही दोन विमाने खरेदी करण्यात आली आहे. ही भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. अमेरीकेत राष्ट्रपतीच्या प्रवासाठी एअर फोर्स वन ही विमाने आहेत. सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा या विमानात आहे. त्याच धरतीवर एअर इंडीया वन या विमानात सुरक्षा यंत्रणा आहे. जवळपास ८ हजार ४०० करोड रूपये किमंतीची ही विमाने आहेत. या विमानाने मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi will visit Pune today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.