गुंजवणी प्रकल्पातील तीन उपसा योजनांना तत्त्वत: मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:50+5:302021-03-20T04:10:50+5:30

रायरेश्वर डोंगरी विकास परिषद कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत माहिती आमदार थोपटे यांनी दिली यावेळी जि.प सदस्य विठठल आवाळे,दिनकर ...

In-principle approval of three upsa schemes in Gunjwani project | गुंजवणी प्रकल्पातील तीन उपसा योजनांना तत्त्वत: मंजुरी

गुंजवणी प्रकल्पातील तीन उपसा योजनांना तत्त्वत: मंजुरी

Next

रायरेश्वर डोंगरी विकास परिषद कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत माहिती आमदार थोपटे यांनी दिली यावेळी जि.प सदस्य विठठल आवाळे,दिनकर धरपाळे,दिनकर

सरपाले,दिलीप थोपटे,विलास बोरागे,नितिन इंगुळकर,दिगंबर चोरघे उपस्थित होते.

वाजेघर खोरे, वांगणी खोरे व शिवगंगा खोरे या तीन उपसा सिंचन योजनेचा समावेश गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचनाही यामध्ये केल्या आहेत.आमदार संग्राम थोपटे यांनी भोर वेल्हे तालुका गुंजवणी पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने दि.०९/०३/२०१८ रोजी दिलेल्या पत्रान्वये वेल्हे व भोर तालुक्यातील वंचित भागांसाठी वाजेघर खोरे,वांगणी खोरे तसेच भोर तालुक्यातील वेळू,शिंदेवाडी,कुसगांव,खोपी व हवेली तालुक्यातील खेड शिवापूर ,रहाटवडे (शिवगंगा खोरे)या भागांकरिता तीन स्वतंत्र उपसा योजना करणेबाबत मागणी केली होती.या उपसा योजनांमुळे वाजेघर खोरे,वांगणी खोरे व शिवगंगा खोऱ्यातील खाली नमूद केलेले क्षेत्र ओलिताखाली येणार असून त्यामध्ये वाजेघर ,खाटपेवाडी,वाजेघर बु.वाजेघर खु.,लव्ही ,लव्ही बु. दादवडी, मेरावणे,आवळी,लव्ही खु.फणशी चिरमोडी, घावर व साखर आणि वांगणी खोऱ्यातील चिंचळ खु.मांगदरी ,कातवडी,वांगणी,कोळवडी,बोरावळे,निगडे बु निगडे मोसे व चिंचळे बु.या गावांचा समावेश येत आहे. शिवगंगा खोऱ्यातील भोर तालुक्यातील वेळू,शिंदेवाडी कुसगांव,खोपी,वर्वे,शिवरे,ससेवाडी,व हवेली तालुक्यातील खेड शिवापूर ,रामनगर ,कल्याण ,रहाटवडे या गावांचा समावेश होत असून या क्षेत्रास अंदाजे ०.३५ अ.घ.फुट पाण्याची आवशकता आहे.गुगल मॅपद्वारे मोजलेले क्षेत्र त्यात प्रत्यक्षात सर्व्हेक्षण करताना बदल होवू शकतो. वेल्हे तालुक्यातील वाजेघर खोरे ५८० हेक्टर क्षेञ,वांगणी खोरे ६६० हेक्टर,भोर व हवेली तालुक्यातील शिवगंगा खोरे १२९० हेक्टर क्षेञ असे एकूण २५३० हेक्टर क्षेञ ओलिता खाली येणार आहे. सदर उपसासिंचन योजनांचा समावेश गुंजवणी प्रकल्पामध्ये केल्याने भोर व वेल्हे तसेच हवेली तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

Web Title: In-principle approval of three upsa schemes in Gunjwani project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.