भिगवणला भरवस्तीत चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:10+5:302020-12-26T04:10:10+5:30
मिनीनाथ रमेश गायकवाड (वय २८, रा. मदनवाडी), रोहिदास गंगाराम दराडे (वय २९, रा. अकोले) अशी आरोपींची नावे आहेत. भिगवन ...
मिनीनाथ रमेश गायकवाड (वय २८, रा. मदनवाडी), रोहिदास गंगाराम दराडे (वय २९, रा. अकोले) अशी आरोपींची नावे आहेत. भिगवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना बातमीदारामार्फत पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या रहिवासी इमारतीमध्ये अवैधपणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे माने यांनी पोलिसांच्या एका पथकाची नियुक्ती करत या ठिकाणी तातडीने छापा टाकला. या वेळी आरोपी मिनीनाथ गायकवाड, रोहिदास दराडे (वय २९, रा. अकोले) दोन महिलांकडून अवैधपणे कुंटणखाना चालवीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी आरोपी वापरत असलेले मोबाईल आणि रोख रक्कम मिळून २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.