मध्य प्रदेशातील शस्त्र कारखान्यावर छापा
By admin | Published: October 5, 2014 01:26 AM2014-10-05T01:26:17+5:302014-10-05T01:26:17+5:30
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी मध्य प्रदेशातील बेकायदा शस्त्र कारखान्यावर छापा टाकून धडक कारवाई केली.
Next
>पुणो : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी मध्य प्रदेशातील बेकायदा शस्त्र कारखान्यावर छापा टाकून धडक कारवाई केली. पोलिसांनी सात पिस्तूलांसह सोळा काडतुसे, पिस्तूल तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी कारखान्याच्या मालकासह दोघांना अटक केली आहे.
रवि उर्फ गोविंदसिंग प्यारसिंग बर्नाला (34), आबा चंद्रसिंग बागले (2क्, दोघेही रा. उमरठी, मध्य प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. बर्नालाच्या घरी परंपरागत शस्त्रनिर्मिती केली जाते. तर बागले हा शस्त्रतस्कर आहे. 1 ऑक्टोबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास बागले हा सुशांत इगनाथ केदारी (22, रा. राहुरी, अहमदनगर) यास शस्त्र विक्री करण्यासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकात आला होता. त्यावेळी गुन्हे शाखेच्या युनीट तीनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने दोघांनाही अटक केली होती. त्यांच्याकडून दोन पिस्तूलांसह सहा काडतुसे जप्त केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन बर्नाला याच्यार्पयत पोलीस पोहोचले.
बर्नालाच्या मध्य प्रदेशातील राहत्या घरी शुक्रवारी पोलिसांना अग्निशस्त्रे बनविण्याचे साहित्य मिळाले. त्याच्या घरामध्ये पिस्तूल आणि दहा जीवंत काडतुसे सापडली.
पिस्तूल, रिव्हॉल्वर, बंदूक आणि काडतुसे बनवून त्याची राज्यामध्ये तस्करी केली जाते. पुणो शहर व परिसरामध्ये 1 जानेवारी 2क्14 पासून आजतागायत 9क् शस्त्र विकली आहेत. ही सर्व शस्त्र जप्त करुन संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बर्नालाकडून खरेदी करण्यात आलेल्या शस्त्रंमधून खुनाच्या प्रयत्नाचे तीन आणि खुनाचे तीन असे सहा गुन्हे घडविण्यात आले आहेत. पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांसह नगर जिल्ह्यांमध्ये या संदर्भात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून एकूण 2 लाख 9क् हजार 58क् रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.