‘प्रिंटिंग’ व्यावसायिकांनी व्यवहार धनादेशाने करावेत
By admin | Published: January 24, 2017 01:27 AM2017-01-24T01:27:09+5:302017-01-24T01:27:09+5:30
निवडणूक कालावधीत बारामती तालुक्यातील सर्व प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांनी त्यांच्याकडे छापण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर
बारामती : निवडणूक कालावधीत बारामती तालुक्यातील सर्व प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांनी त्यांच्याकडे छापण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर प्रेसचे नाव व पत्रकांच्या छपाईची संख्या ठळकपणे नमूद करावी, तसेच सर्व व्यवहार धनादेशाच्या माध्यमातून करून निवडणूक कालावधीतील व्यवहारांचा सर्व तपशील जवळ ठेवावा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) शंकरराव जाधव यांनी केल्या.
बारामती तालुक्यातील प्रिंटिंग प्रेसचालक-मालकांची बैठक तहसीलदारांच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हनुमंत पाटील, निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील उपस्थित होते.
शंकरराव जाधव म्हणाले, की जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बारामती तालुक्यातील प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांनी त्यांच्या प्रेसमध्ये कोणत्याही पक्षाच्या अथवा वैयक्तिक उमेदवारांच्या प्रचार साहित्याची छपाई करीत असताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
या बैठकीला बारामती शहरासह तालुक्यातील प्रिंटिंग प्रेसचे मालक उपस्थित होते.
(प्रतिनिधी)