पोलीस भरतीत होमगार्डला प्राधान्य द्या

By admin | Published: March 28, 2015 11:48 PM2015-03-28T23:48:12+5:302015-03-28T23:48:12+5:30

पोलीस भरतीत सर्वांत प्रथम होमगार्ड यांना प्राधान्य देऊन त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे,’’ असे मत माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

Prioritize the Home Guard in police recruitment | पोलीस भरतीत होमगार्डला प्राधान्य द्या

पोलीस भरतीत होमगार्डला प्राधान्य द्या

Next

दौंड : ‘‘पोलीस भरतीत सर्वांत प्रथम होमगार्ड यांना प्राधान्य देऊन त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे,’’ असे मत माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
दौंड येथील प्रशासकीय इमारतीत होमगार्ड कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. थोरात म्हणाले, पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड काम करीत असतो. परिणामी, तो समाजाची सेवा करतो. त्यामुळे होमगार्डच्या अडीअडचणी शासनाने तातडीने सोडविल्या पाहिजेत. समाजातील सर्व स्तरातील मंडळींनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री यांनी प्रशासकीय इमारतीला जागा आणि शासनाचा निधी दिल्यामुळेच याठिकाणी भव्य वास्तू उभारली.
या वेळी जिल्हा समादेशक दीपक जांभळे, प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया, अप्पासाहेब पवार, विवेक संसारे, रवी पवार, अशोक मुनोत, रवींद्र जाधव, प्रवीण आहुजा, विनायक विखरणकर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी नायब तहसीलदार उत्तम बढे, डॉ. प्रेमकुमार भट्टड, आबा वाघमारे, अ‍ॅड. विलास बर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अ‍ॅड. विलास बर्वे यांनी होमगार्ड कार्यालयाला संगणक भेट दिले. विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश बनसोडे यांनी आभार मानले.

४गेल्या अनेक वर्षांपासून एका छोट्या खोलीत होमगार्डचे कार्यालय कार्यरत होते. मात्र, आता त्यांना प्रशासकीय इमारतीत भव्य जागा मिळाल्याने होमगार्ड आणि त्यांचे अधिकारी आनंदित होते.
४दरम्यान, तत्कालीन आमदार रमेश थोरात यांच्या अथक प्रयत्नातून ही इमारत उभी राहिल्याने कार्यक्रमात प्रत्येक भाषणकर्त्याने रमेश थोरात यांच्या नावाचा उल्लेख माजी आमदार न करता आमदार रमेश थोरात असा करत होते. तेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर सध्या ते माजी आमदार आहेत. मात्र, आपण त्यांच्या नावापुढे आमदार ही उपाधी लावली, असे भाषणकर्त्यांना बोलले तेव्हा सर्वच म्हणाले कामाला महत्त्व आहे.
पदाला महत्त्व नाही.

४या वेळी होमगार्डचे जिल्हा समादेशक दीपक जांभळे म्हणाले, की आम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. तेव्हा आमच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला विविध क्षेत्रांतील आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित आहेत. परंतु पोलीस अधिकारी किंबहुना एकही उपस्थितीत नाही, ही मनाला चटका लावणारी बाब आहे.

Web Title: Prioritize the Home Guard in police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.