सभासद हिताला प्राधान्य : शिवाजीराव आढळराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:15 AM2020-12-30T04:15:09+5:302020-12-30T04:15:09+5:30
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लांडेवाडी-चिंचोडी (ता.आंबेगाव) येथील श्री.भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक डायरीचे प्रकाशन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. ...
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लांडेवाडी-चिंचोडी (ता.आंबेगाव) येथील श्री.भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक डायरीचे प्रकाशन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक कल्पनाताई आढळराव पाटील, सागर काजळे, शिवाजीराव ढोबळे,अभिमन्यू आबा लांडगे, योगेश बाणखेले, भिकाजी बोकड, अशोक मामा गव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव, माजी उपसरपंच राजेंद्र शेवाळे आदी उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले भैरवनाथ पतसंस्थेने तीनशे कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. गरजू सभासदांना पतपुरवठा केला जातो. पतसंस्थेने सभासदांच्या हीताना नेहमीच प्राधान्य दिले आहे.कोरोना आपत्ती काळात कोरोणा योद्ध्यांचा सन्मान,गरजूंना किराणा वाटप, सभासदांसाठी मास्क व सॅनिटायझर वाटप असे उपक्रम राबविण्यात आले. सन २०२१ सालासाठी दिनदर्शिका व वार्षिक डायरी प्रकाशित करण्यात आली आहे. त्याचा फायदा सर्वांना होईल. संचालक सागर काजळे यांनी आभार मानले.
--
फोटो २८ मंचर भैरवनाथ
फोटोखाली: लांडेवाडी येथील श्री. भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक डायरीचे प्रकाशन शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले.