खेडच्या वनहद्दीतील रस्ते, पुलांच्या कामांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:18+5:302021-07-16T04:10:18+5:30
राजगुरुनगर : खेड वन विभागाच्या हद्दीतील रस्ते, पूल आदी विकासकामे प्राधान्याने मार्गी लावली जातील, असा विश्वास वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे ...
राजगुरुनगर : खेड वन विभागाच्या हद्दीतील रस्ते, पूल आदी विकासकामे प्राधान्याने मार्गी लावली जातील, असा विश्वास वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
शिरोली (ता. खेड) येथे नवीन राजगुरूनगर वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यात आहे. मात्र नागरिकांना वळसा घालून आंबेगाव तालुक्यातून जावे लागते. पूर्वी वापरात असलेला भोरगिरी भीमाशंकर रस्ता सुरू करावा, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली. त्यावर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेण्यात येईल. रस्ता प्रश्न मार्गी लावू असे भरणे म्हणाले.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण चांभारे, अनिल राक्षे, मंगल चांभारे, अशोक शेंडे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलासर सांडभोर, मयूर मोहिते, सुभाष होले, विलास मांजरे, संध्या जाधव, मनीषा टाकळकर उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १५राजगुरुनगर वनमंत्री भरणे
फोटो ओळ. राजगुरूनगर वनविभागाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करताना दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पानसरे व मान्यवर.