अखेर खासगी डेअरींना मिळाले दूध भुकटी अनुदान; पुण्यातील पाच तर, नगरच्या एका दूध डेअरीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 03:42 AM2020-12-01T03:42:36+5:302020-12-01T03:42:47+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाच्या भुकटीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले होते. त्यामुळे खासगी दूध संघ अडचणीत सापडल्याने अनुदान. त देण्याची मागणी करण्यात आली होती,

Private dairies finally get milk powder subsidy; Five in Pune and one in the city | अखेर खासगी डेअरींना मिळाले दूध भुकटी अनुदान; पुण्यातील पाच तर, नगरच्या एका दूध डेअरीचा समावेश

अखेर खासगी डेअरींना मिळाले दूध भुकटी अनुदान; पुण्यातील पाच तर, नगरच्या एका दूध डेअरीचा समावेश

googlenewsNext

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर दूध भुकटीच्या किंमती कमी झाल्यानंतर राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे अनुदान मिळण्यासाठी संबंधित दूध डेअरी मालकांकडून प्रचंड पाठपुरावा सुरू होता. अखेर सरकारने थकीत अनुदानापोटी २५ कोटी ६९ लाख ८८ हजार ९८२ रुपयांचे अनुदान नुकतेच वितरित केले. यात दूध भुकटी तयार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पाच आणि नगर जिल्ह्यातील एका दूध डेअरीचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाच्या भुकटीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले होते. त्यामुळे खासगी दूध संघ अडचणीत सापडल्याने अनुदान. त देण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार सरकारने गायीच्या दुधाला १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२० या काळात प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्याची योजना राबविली. वित्त विभागाकडून ही रक्कम दुग्ध व्यवसाय विकास विभागाला मिळाली. अनुदान वाटपाची रक्कम खाजगी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार काम सुरु असून, अनुदान वितरणास थोडा अवधी लागल्याची माहिती पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांनी दिली. 

या दूध डेअरींना मिळाले अनुदान
एल. व्ही. डेअरी, पाटस - ९० लाख ११ हजार
श्रायबर डायनामिक्स डेअरीज प्रा. लि. - ४ कोटी ६८ लाख ९५ हजार
इंदापूर डेअरी अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टस लि. - ७ कोटी ३५ लाख ९१ हजार
पराग मिल्क फुडस लि. - ६ कोटी ९२ लाख ४५ हजार
कुतवळ फुडस प्रा. लि. - ३ लाख ७५ हजार
प्रभात डेअरी प्रा. लि. अहमदनगर - ५ कोटी ७८ लाख
 

Web Title: Private dairies finally get milk powder subsidy; Five in Pune and one in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध