कोरोनाच्या संशयामुळे रूग्णांना दाखल करून घेण्यास खासगी हॉस्पिटलचा नकार; महापौरांकडून कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:57 PM2020-04-10T19:57:20+5:302020-04-10T19:57:43+5:30
सर्दी, खोकला, धाप लागणारे वयोवृध्द तथा मधुमेह व रक्तदाब असलेल्या रूग्णांनाही उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार
निलेश राऊत-
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग शहरात मोठ्या प्रमाणात झाल्याने, सर्दी, खोकला, धाप लागणारे वयोवृध्द तथा मधुमेह व रक्तदाब असलेल्या रूग्णांनाही उपाचारासाठी दाखल करून घेण्यास खासगी हॉस्पिटलकडून नकार दिला जात आहे. परिणामी या लॉगडाऊनच्या काळात संबंधित रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागत असून, कोविड-१९ शी दूरमात्र संबंध नसलेल्या बहुतांशी रूग्णाना विनाकारण ससून व नायडू हॉस्पिटलकडेच धाव घ्यावी लागत आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गंभीर दखल घेतली असून, खाजगी हॉस्पिटलने अशाप्रकारे रूग्णांना नाकारण्याचे प्रकार सहन केले जाणार नसल्याचे सांगून संबंधित हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हडपसर येथील सैय्यदनगर परिसरातील ६५ वर्षीय व्यक्ती आजारी पडल्याने त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले़ तेव्हा संबंधित रूग्णाची प्रथम ससूनमधून कोविड-१९ तपासणी करून आणा असे सांगितले गेले़ त्यामुळे त्या रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना ससूनमध्ये तपासणी करून आणले तेव्हा त्या रूग्णाचा कोविड -१९ (कोरोना संसर्ग) चा अहवाल निगेटिव्ह आला़ हा अहवाल घेऊन रूग्णाचे नातेवाईक पुन्हा खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले परंतू त्या रूग्णास दाखल करून घेण्यास त्या हॉस्पिटलसह पुण्यातील नामांकित हॉस्पिटलनेही नकार दिला़
असाच दुसरा एक प्रकार दोन दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात घडला़ श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने एका ज्येष्ठ नागरिकास लॉकडाऊन असल्यामुळे जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी नेले़ या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्या ज्येष्ठ व्यक्तीने रात्री रक्तदाबाची गोळी खाल्ली नव्हती हेही नातेवाईकांनी सांगितले़ परंतू सदर हॉस्पिटलने त्यांना आमच्याकडे बेड खाली नाही म्हणून दाखल करून घेण्यास नकार दिला़ परिणामी लॉकडाऊनमुळे त्या रूग्णाच्या नोतवाईकांनी पोलीस परावनग्या, गाडी भाड्याने घेणे व आदी आटापिटा करून रूग्णास मध्यवर्ती भागातील इतर चार खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले पण तिथेही त्यांना अशाच नकारास सामोरे जावे लागले़ दरम्यान त्या रूग्णास श्वास घेण्यास आणखीनच त्रास झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी ओळखीतील प्रशासकीय अधिकाºयाच्या मदतीने ससूनमधील एका डॉक्टरकडून तपासणी करून घेतली़ त्यावेळी केवळ रक्तदाबाची गोळी घेतली गेली नसल्याने व लघवी न झाल्याने त्यांना धाप लागल्याचे आढळून आले़ त्या रूग्णावर जुजबी उपचार करून त्यांना लागलीच ठिकही करण्यात आले़ परंतू साध्या उपचाराने बºया होणाºया या रूग्णास केवळ कोविड-१९ च्या भितीपोटी अनेक मोठ्या व नामांकित हॉस्पिटलनेही नाकारले़
या दोन उदाहरणांसह शहरात नित्याने असे प्रकार होत असून, कोविड-१९ च्या भितीने अनेक खाजगी हॉस्पिटलने आपल्या ओपीडीही बंद केल्या आहेत़ यामुळे कोविड-१९ शी दूरामात्र संबंध नसलेल्या अनेकांना कोरोना आपत्ती काळात काही खाजगी हॉस्पिटलकडून नाकारण्याची भूमिका अयोग्य असल्याचे बोलले जात आहे़
----------------------------
खाजगी हॉस्पिटलमध्ये खाटा राखीव असताना ही भूमिका निषेधार्ह
सैय्यदनगर येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोव्हिड-१९ चा अहवाल निगेटिव्ह आला असताना शहरातील प्रसिध्द खाजगी हॉस्पिटल संबंधित नागरिकाला दाखल करून घेत नाहीत़ याबाबत पालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनाही आयुक्तांच्या सूचनेनुसार माहिती दिली़ पण त्या अधिकाºयानेही याची गांर्भियाने दखल घेतली नाही व पुन्हा फोनही घेतला नाही़ असा आरोप सय्यदनगर प्रभागातील नगरसेविका रूकसना इनामदार यांचे पती शमशउद्दीन इनामदार यांनी लोकमतशी बोलताना केला़
महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी हॉस्पिटलला काही खाटा राखीव ठेवण्यास सांगितले असताना, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे़ त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत लक्ष घालून नागरिकांना खाजगी हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावेत़ अन्यथा संबंधित रूग्ण व त्यांच्या नातेवाईक महापालिकेत दरवाजाजवळ आणून बसवू असा इशारा नगरसेविका रूकसना शमशउद्दीन इनामदार यांनी दिला आहे़
-------------
रूग्णांना नाकारल्यास कठोर कारवाई करू - महापौर
शहरामधील काही खाजगी हॉस्पिटलमधील ओपीडी बंद करण्यात आल्या आहेत का, तसेच रूग्णांना नाकारण्याच्या झालेल्या प्रकारांची चौकशी करण्यात येणार आहे़ दरम्यान कोरोनाच्या आपत्ती काळात खाजगी हॉस्पिटलने रूग्णांना नाकारू नये़ असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत असून, कोणी रूग्ण नाकारल्यास संबंधित हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे़