खासगी हाॅस्पिटलनी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी परवानगी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:07+5:302021-04-18T04:10:07+5:30
तालुक्यात अशा परवानगीशिवाय कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हाॅस्पिटल व्यवस्थापनाने रितसर परवानगी घेतली तर रेमडेसिविर औषधे आता थेट नोंदणी ...
तालुक्यात अशा परवानगीशिवाय कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हाॅस्पिटल व्यवस्थापनाने रितसर परवानगी घेतली तर रेमडेसिविर औषधे आता थेट नोंदणी केलेल्या हाॅस्पिटल व्यवस्थापनाला दिली जाणार आहे. शासन नियमानुसार संबंधित हाॅस्पिटलने परवानगी घेऊनच कोरोना रुग्णांवर उपचार केले तर संबंधित रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवणे सोपे होऊन नातेवाईकांची होणारी धावपळ थांबून, रुग्णांचे होणारे हाल थाबंण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील खासगी हाॅस्पिटल व्यवस्थापनाने डीसीएचसी कोविड सेंटर सुरु करण्यासाठी आवश्यक परवानगी करिता तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.बळीराम गाढवे यांच्याकडील अर्ज सादर करून परवानगी घ्यावी.त्यानंतर खेड उपविभागीय अधिकारी तथा प्रांत विक्रांत चव्हाण यांच्याकडून परवानगी मिळणार आहे. तालुक्यातील खासगी हाॅस्पिटल आस्थापनांनी लवकर परवानगी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी केले आहे.