खासगी लक्झरी बसमुळे कोंडी
By admin | Published: March 28, 2017 02:52 AM2017-03-28T02:52:48+5:302017-03-28T02:52:48+5:30
सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौक ते मांजरी फाटा चौकापर्यंत रात्री आठ ते साडेबारापर्यंत खासगी लक्झरी
हडपसर : सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा चौक ते मांजरी फाटा चौकापर्यंत रात्री आठ ते साडेबारापर्यंत खासगी लक्झरी बस रस्त्यात उभ्या राहत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन किरकोळ अपघात आणि वाहनचालकांची बाचाबाची दररोज सुरू असते. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त केला.
वाहतूककोंडी आणि गर्दी म्हटले की सोलापूर रस्ता डोळ््यासमोर
उभा राहतो. शाळकरी मुले आणि कामगार घरी येईपर्यंत घरच्या मंडळींना काळजी लागलेला असते. तीन वर्षापूर्वी जुन्या पोस्ट कार्यालयासमोर दोन लक्झरी बसमध्ये सापडून एकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी तत्कालीन आमदार महादेव बाबर यांनी वाहतुकीला अडथळा ठरणारे दुभाजक काढून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर या ठिकाणी लक्झरी थांबण्याचे बंद झाले होते, असे नागरिकांनी सांगितले.
मात्र, पुन्हा काही दिवसांनी या ठिकाणी लक्झरी बस थांबू लागल्या. आता दररोज रात्री या लक्झरी बस मगरपट्टा चौक ते मांजरीफाटा चौकापर्यंत थांबलेल्या असतात. त्यामुळे रात्री-अपरात्री कामावरून येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.
(वार्ताहर)
रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला
लक्झरीचालक प्रवासी मिळविण्यासाठी रस्त्यात बस उभ्या करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होत असते. वाहतूककोंडी झाल्यामुळे अनेक वेळा रुग्णवाहिका अडकते.
ाागरिकांना कोंडीतून बाहेर पडण्यासाठी रोज कसतर करावी लागतेच, पण रुग्णवाहिकांनाही वाट मिळण्यात अडचणी येतात. वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना केली जात नसल्याने रग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागतो. यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.