खासगी शाळांचे ३ दिवस ऑनलाईन शिक्षण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:29 AM2020-12-15T04:29:07+5:302020-12-15T04:29:07+5:30

पुणे : कोरोनामुळे केवळ पालकांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही तर शाळांचीही आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. खासगी ...

Private schools closed for 3 days | खासगी शाळांचे ३ दिवस ऑनलाईन शिक्षण बंद

खासगी शाळांचे ३ दिवस ऑनलाईन शिक्षण बंद

Next

पुणे : कोरोनामुळे केवळ पालकांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही तर शाळांचीही आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. खासगी माध्यमाच्या इंग्रजी शाळांना आता ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणेही अश्यक्य झाले आहे. राज्य शासनानेच यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असून याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी फेड्रेशन ऑफ स्कूलस् असोसिएशन आॅफ महाराष्ट्रातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे चौदाशे शाळा तीन दिवस बंद ठेवल्या जाणार आहे.

कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने शाळांनी पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावू नये, असे परिपत्रक राज्याच्या शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द केले. त्यामुळे शाळांनी पालकांना शुल्क भरण्यास सवलत दिली. परंतु, आर्थिक स्थिती चांगली असणारे पालकही शाळांचे शुल्क भरत नसल्याचा दावा फेड्रेशन ऑफ स्कूलस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कार्याध्यक्ष जागृती धर्माधिकारी सचिव ओम शर्मा, मिलिंद घाडगे उपस्थित होते.

राजेंद्र सिंह म्हणाले, स्कूलबस, जेवन, जिमखाना आदी गोष्टींसाठी आकारले जाणार शुल्क वगळून पालकांनी टप्प्या-टप्प्याने शुल्क भरावे, असे आवाहन शाळांतर्फे पालकांना केले. कोरोनानंतर बऱ्याच शाळांनी ट्रस्टमधील रक्कम खर्च क रून शिक्षकांचे पगार केले. शाळांकडे शुल्क जमा करणारे केवळ ३० टक्के पालक असून शुल्क जमा करण्यास नकार देणाऱ्या पालकांची संख्या सुमारे ५० टक्के आहे. तर २० टक्के पालकांनी शुल्क भरण्याबाबत अडचण असल्याचे शाळांना कळवले आहे.

शाळांकडे जमा होणाऱ्या केवळ ३० टक्के शुल्कावर शिक्षकांचे पगार, शाळेच्या जागेचे भाडे, बँकेचे हप्प्ते आदी गोष्टीसाठी भागवणे आता शक्य होत नाही. त्यामुळे शाळांवर ऑनलाईन शिक्षणही बंद करण्याची वेळ आली आहे. शासनाने व पालकांनी शाळांची बाजूही समजून घ्यावी ; यासाठी येत्या १५ ते १७ जानेवारी या कालावधीत शाळांचे सर्व शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घतला आहे,असेही राजेंद्र सिंह म्हणाले.

Web Title: Private schools closed for 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.