बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:41 PM2018-05-19T17:41:48+5:302018-05-19T17:41:48+5:30

बीअारटी मार्गात खासगी वाहनांची घुसखाेरी सातत्याने हाेत असून फारशी कारवाई हाेत नसल्याने वाहनचालकांवर अंकुश राहिला नसल्याचे चित्र अाहे.

private vehicles entres into brt routes | बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा

बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा

Next
ठळक मुद्देबीअारटी मार्गात खासगी वाहनांची घुसखाेरी चालूच

पुणे : बीअारटी मार्गातून बीअारटी बसच्या व्यतिरिक्त इतर वाहन गेल्यास ते जप्त करण्याचे अादेश पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष अाणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार काहीकाळ कारवाई करण्यास सुरुवात करण्यात अाली हाेती. परंतु त्यांच्या बदलीनंतर अाता पुन्हा परिस्थिती पहिल्यासारखीच झाली असून बीअारटी मार्ग म्हणजे अाअाे जाअाे घर तुम्हारा असे चित्र सध्या पाहायला मिळत अाहे. 
    संगमवाडी ते विश्रांतवाडी तसेच येरवडा ते खराडी या बीअारटी मार्गात अनेक खासगी वाहनांची घुसखाेरी हाेत अाहे. यावर अाळा घालण्यासाठी सुरुवातील  ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात अाली. या ट्रॅफिक वार्डनलाही अनेक वाहनचालक जुमानत नाही. काही वाहनचालकांनी या ट्रॅफिक वार्डनला उडावल्याच्या घटनाही या ठिकाणी घडल्या अाहेत. या मार्गातील खाजगी वाहनांच्या घुसखाेरीमुळे अनेक अपघातही या मार्गांमध्ये झाले अाहेत. त्यात अनेकांना अापल्या प्राणांना मुकावे लागले. पीएमपीचे तत्कालिन अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी बीअारटी मार्गात घुसखाेरी करणारी वाहने जप्त करण्याचे अादेश काढले हाेते. त्यानंतर काही दिवस कारवाई सुद्धा करण्यात अाली. परंतु सध्या परिस्थिती पूर्वीसारखीच झाली असून किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त खाजगी वाहने या मार्गातून जात असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे बीअारटी मार्ग अाणि बस जलद वाहतूक सेवा हे केवळ फार्स बनून राहिले अाहेत. 
    संगमवाडीवरुन विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या बीअारटी मार्गात अात्तापर्यंत अनेक अपघात झाले अाहेत. या मार्गात घुसखाेरी केलेली वाहने वेगात जात असल्याने समाेरुन येणाऱ्या बसला धडकून अपघात घडण्याची शक्यता अाहे. वेगामुळे अपघात हाेऊन या मार्गाचे डिव्हायडर्स तुटल्याच्या घटनाही या ठिकाणी घडल्या अाहेत. वाहनचालकांमध्ये जागृती हाेत नसून वार्डनला दमदाटी करुन या मार्गात वाहने घुसवली जात अाहे. त्यामुळे या उर्मट वाहनचालकांपुढे पीएमपी प्रशासन हतबल झाले असून त्यांना राेखायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला अाहे. या ठिकाणी फाटक बसविण्याचा पीएमपीचा विचार असून ताे कधी पुर्नत्वास येताेय हे अाता बघावे लागणार अाहे. 
    याबाबत बाेलताना पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने म्हणाले, बीअारटी मार्गात घुसखाेरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत अाहे. कालच या मार्गातून जाणाऱ्या 20 वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे. त्याचबराेबर खास बीअारटीसाठी एका बीअारटी सेलची स्थापना केली असून त्या माध्यमातून बीअारटी मार्गातील प्रश्न साेडविण्यात येणार अाहेत. सध्या चालू असलेली कारवाई येत्या काळात अाम्ही अधिक गतीने करणार अाहाेत. फाटकाबाबतची अंमलबजावणी हा पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारितला प्रश्न असून त्यावरही विचार विनिमय करण्यात येत अाहे. 

Web Title: private vehicles entres into brt routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.