भोरच्या भूमिअभिलेख कार्यालयाचे खासगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:28 AM2020-12-04T04:28:40+5:302020-12-04T04:28:40+5:30
सुर्यकांत किंद्रे भोर: येथील भूमिअभिलेख कार्यालयात काम करण्यासाठी उपअधिक्षकांनीच तीन खासगी व्यक्तींची नेमणूक केल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे़ ...
सुर्यकांत किंद्रे
भोर: येथील भूमिअभिलेख कार्यालयात काम करण्यासाठी उपअधिक्षकांनीच तीन खासगी व्यक्तींची नेमणूक केल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे़ या खासगी व्यक्तींकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे़ एवढेच नाही तर कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयाच्या बाहेर घेऊन जाणे, काही वेळेस घरी घेऊन जाणे, व्यवस्थीत न हातळणे असे प्रकार होत असल्याने कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, नागरिकांनी यासंदर्भात तक्रार केली असता उपअधिक्षकांनी मात्र, याकडे कानाडोळा केला आहे़
भूमी अभिलेख कार्यालयात काम करणाºयासाठी उपअधिक्षकांनी स्वत:च पाच ते १० हजार रुपये पगार देऊन तीन खासगी व्यक्तींची नेमणूक केली आहे़ ही नेमणूक खासगी असून त्याला कोणताही शासकीय अधिकार नाही़ त्यामुळे त्यांनी नेमून दिलेली कामे करणे अपेक्षित आहे़ मात्र, असे न होता हे तिघेजण संर्पूण कार्यालयच चालवत आहे़ नकला करणे, आवक-जावक रजिस््टर लिहिणे, मोजणी अर्ज ग्राहकांकडून पैसे घेऊन भरणे, रेकॉर्ड हाताळणे, स्मिम नकला, गट नकाशा, फ ाळणी नकाशा, गाव नकाशा, नक्कल याचे अधिकारी नसताना ही महत्त्वाची कागदपत्रे झेरॉक्स काढण्यासाठी कार्यालयाबाहेर घेऊन जाणे, त्यावर सही, शिक्के मारणे त्याचबरोबर मोजणीसाठी पैशाची मागणी करण्याचा उद्योग सुरु केला आहे़
भूमी अभिलेख कार्यालयाकडून नागरिकांना स्कीमचा गट नकाशा, फाळणी, सूड, टिपणी, आकारबंद गुणाकार बुक, गाव नकाशा, नकल्या दिल्या जातात आणि जमिनीची मोजणी केली जाते़ उपआधिक्षक, कार्यालय सहायक आणि निमतानदार यांनी तातपुरत्या स्वरुपात नेमलेल्या व्यक्तींचा येथे मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असतो़ यामुळे नागरिकांनी अर्ज केल्यावर आठ दिवसात नकला देणे गरजेचे असतानाही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात़ जमिनीची मोजणी होऊन सदर मोजणीवर अनेकदा हरकती घेतल्या आहेत.त्या चालवण्याचा अधिकार उपआधिक्षक भुमीआभिलेख यांना आहेत.माञ या हरकती चालवुन वेळेत निर्णय (निकाली) दिला जात नाही.अशी अनेक प्रकरणे प्रलंबीत आहेत.अनेकदा अर्थिक देवाण घेवाण होण्यासाठी ही प्रकरणे प्रलंबीत ठेवुन लोकांना हेलपाटे मारायला लावले जात असल्याचे बोलले जात आहे.
भुमीअभिलेख कार्यालयाकडे जमिन मोजायला स्वत:ची मशिन नाही. त्यामुळे येथील निमतानदार (कर्मचारी) खासगी मोजणी करणाºयाकडून माशिन घेऊन मोजणी करतात याचे पैसे खातेदारांकडुनच घेतले जात असल्याचे खातेदार सांगतात. या शिवाय वारसनोंद किंवा हक्कसोडपञासाठी मोठया प्रमाणात अर्थिक मागणी होत असते.
चौकट़़़़़़़़़़़़़
कागदपत्रे वापरताना गांभीर्य नाही
अभिलेख कार्यालयात असलेली कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी ती कार्यालयाबाहेर नेमून दिलेल्या व्यक्ती घेऊन जातात़ हे घेऊन जात असताना कोणतेही गांभीर्य दिसत नाही़ काही वेळेस महत्त्वाची कागदपत्रेही घरी घेऊन जातात़ त्यामुळे या कागदपत्रांवर कोणाच्याही नोंदी करता येणे शक्य असल्याने याचा फ टका शेतकºयांना बसण्याची शक्यता आह़े त्यामुळे या कर्मचाºयांना कोणती कामे दिली आहे़ याचा खुलासा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ दरम्यान, भूमी अभिलेखच्या उपअधिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी आपण रजेवर असून यासंदर्भात काहीही बोलणार नाही असे त्यांनी सांगितले़
कोट़़़़़़़़़़़़
भुमीअभिलेख कार्यालयात विविध नकाशे,नकला मिळण्या साठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात.आणी जमिनीची मोजणीला सात सात महिने लागतात यामुळे लोकांना वेळ आधिक लागत आहे याकडे उपअधिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.
सचिन देशमुख
समाजिक कार्यकर्ते
०२ भोर भूमी