शिवणेमध्ये देशमुख नगरची समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 AM2021-06-22T04:08:21+5:302021-06-22T04:08:21+5:30
महानगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत असला तरी नागरिक रहदारीच्या जागी रोजच कचरा टाकत आहेत आणि तो न टाकण्यासाठी काहीच ...
महानगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत असला तरी नागरिक रहदारीच्या जागी रोजच कचरा टाकत आहेत आणि तो न टाकण्यासाठी काहीच प्रतिबंध केले जात नाहीत. कचरा उचलल्यानंतर त्यावर औषध फवारणी केली जात नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास देखील वाढले आहेत.
रात्रीच्या वेळी लोक इथे कचरा आणून टाकतात तसेच सकाळी लवकर कामाला जाणारा कर्मचारी वर्ग देखील इथेच कचरा फेकत असल्यामुळे कचऱ्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे.
कचऱ्यामुळे रस्त्याचा मोठा भाग देखील व्यापला जात आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
इथे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
जवळच राहत असलेले सचिनदादा देशमुख यांना संपर्क केला असता, ते म्हणाले की प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनदेखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कचरा उचलला जात असला तरी तो तेथे न टाकण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत असताना येथे कचरा न टाकावा यासाठी कर्मचारी तैनात करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होते.