लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 04:04 PM2020-04-20T16:04:02+5:302020-04-20T16:06:59+5:30

कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याला न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तरुण वकील ही अपवाद राहिलेले नाहीत.

Problem in distribution of kit to junior advocate in court by lockdown | लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा

लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा

googlenewsNext
ठळक मुद्देतरुण वकिलांसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे मदतीचा हात एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा असलेले कीट

पुणे : लॉकडाऊनच्या नियमांची गेल्या दोन दिवसापासून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याचा फटका मात्र ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीटचे वाटप करताना बसला आहे. न्यायालयातील ५२५ ज्युनियर वकिलांनी या कीटसाठी बार असोसिएशनकेडे संपर्क केला आहे. मात्र , सध्या फक्त ३०० ते ३५० जणांना या किटचे वाटप करण्यात आले असून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उर्वरीत १५० ते १७५ जणांना किटचे वाटत करण्यात येणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी सांगितले. 
लॉकडाऊन कडक केल्यामुळे ज्युनिअर वकिलांना अन्नधान्य आणि किराणाच्या कीट वाटण्यास अडचण निर्माण झाली आहे. यासाठी बाहेर पडलेल्या वकिलांना पोलिसांनी माघारी घरी पाठविले. आतापर्यंत सुमारे ३५० वकिलांना किटचे वाटप करण्यात आले असून, लॉंकडाऊन शिथिल झाल्यानंतर उर्वरीत जणांना किटचे वाटत करण्यात येणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी सांगितले.
देशात कोरोनाचा संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालये बंद आहेत. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे बारचे अध्यक्ष मुळीक, उपाध्यक्ष  योगेश तुपे, सचिन हिंगणेकर, सचिव घनश्याम दराडे, विकास बाबर, खजिनदार भाग्यश्री गुजर-मुळे, हिशोब तपासणीस ओमकार चव्हाण यांच्याकडून  या योजनेतंर्गत पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्?टीस असलेल्या वकिलांना अन्नधान्य आणि किराणा देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी अध्यक्ष मुळीक यांनी दोन लाख रुपये दिले असून, इतर सिनिअर वकिलांनीही मोठी मदत केली आहे. मुळातच ज्युनिअर वकिलांना काम कमी असते.
कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याला न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तरुण वकील ही अपवाद राहिलेले नाहीत. अशा तरुण वकिलांसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे. असोसिएशनतर्फे एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा असलेले कीट देण्यात येत आहेत. 

Web Title: Problem in distribution of kit to junior advocate in court by lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.