चाकण-वांद्रा एसटी वाहतूक बंद झाल्याने अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:59 AM2018-09-29T00:59:33+5:302018-09-29T00:59:51+5:30
चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे.
आसखेड : चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. तसेच, विद्यार्थ्यांना उन्हापावसातून सुमारे १२ ते १५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे संतप्त पालकांनी राजगुरुनगर आगारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
चाकणच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण नागरिकांचा या हिंसक आंदोलनाशी काही संबध नसताना हा त्रास सहन करावा लागत आहे. या पश्चिम पट्ट्यात दुग्धव्यावसायिक जास्त आहेत. ते दररोज पुणे, पिंपरी येथे दूधविक्रीसाठी जातात, त्यांची गैरसोय झाली आहे. तर काहीजण त्यासाठी स्वत:च्या खासगी वाहनाचा वापर करत आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या कामगार यांची गैरसोय होऊ लागली आहे. तरी एसटी मंडळाने त्वरित सेवा सुरू करावी, अशी मागणी पश्चिम पट्ट्यातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा आगारात ठिय्या
आंदोलन ईशारा दिला आहे.
चाकणमध्ये झालेल्या आंदोलनाचा पडसाद परिसरातील नागरिकांवर उमटलेआहे. येथील एसटी सोय कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...तर रस्त्याची पूर्णत: चाळण झाली असल्याने एसटी सोडता येणार नाही, असेही उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे.
तर, ज्या तळेगाव व खेड येथील क्रशसॅन्ड, खडीमशिन व्यावसायिकांच्या वाहनांच्या प्रचंड ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची पार वाट लावली आहे, ते गप्प बसलेले आहे.
त्यांच्याविरुद्ध भीतीपोटी
दबक्या आवाजात चर्चा
सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती त्यांनी करावी, अशी
चर्चा आहेत.