संतवाल्हे सुकलवाडी रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचा प्रश्न कायमचा मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:40+5:302021-08-13T04:14:40+5:30

--------------- वाल्हे : वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ आणि सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख, नावळी अशा अनेक ...

The problem of Santwalhe Sukalwadi railway gate underpass will be solved forever | संतवाल्हे सुकलवाडी रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचा प्रश्न कायमचा मिटणार

संतवाल्हे सुकलवाडी रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचा प्रश्न कायमचा मिटणार

Next

---------------

वाल्हे : वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ आणि सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख, नावळी अशा अनेक लहान- मोठ्या वाड्या-वस्त्यांवर जाणारा मुख्य मार्गावर असलेल्या रस्त्यावरील रेल्वेगेट भुयारी मार्गावर ड्रेनेजलाईन टाकण्याच्या काम तातडीने होणार असल्याने पावसाळ्यात भुयारी मार्गात जमा होणारे पाणी आणि त्यामुळे ठप्प होणारी वाहतूक बंद होण्याची समस्या कायमची मिटणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी आज सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील भुयारी मार्गातील ड्रेनेज लाईनच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. कामाच्या संबंधित अभियंत्यांना सूचना केल्या. या वेळी सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, प्रा. संतोष नवले, सामाजिक कार्यकर्ते जयवंत भुजबळ, डॉ. रोहिदास पवार, काशिनाथ दुर्गाडे, दिपक कुमठेकर, साईनाथ चव्हाण, दादा म्हेत्रे, शिरीष नवले, त्रिंबर भुजबळ, कालिदास पवार आदी उपस्थित होते.

दुर्गाडे म्हणाले की, रेल्वे प्रशासनाला, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार, मध्य रेल्वेचे सदस्य प्रवीण शिंदे यांच्या माध्यमातून वारंवार निवेदन देऊन तसेच बैठका घेऊन येथील भुयारी मार्गाचा प्रश्‍न मार्गी लागत लागला आहे. मागील दोन वर्षांपासून, पावसाळ्यात येथील भुयारी मार्गाचा विषय, पावसाचे पाणी साचून राहिल्यावर चर्चेला येत होता. केवळ आश्‍वासन, चर्चेच्या गुऱ्हाळ्यात तो गुंडाळला जात होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेचे सदस्य प्रवीण शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे मंडलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत बुधवारी (दि. ९ जुन) रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, बैठकीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी आंबळे, राजेवाडी, बेलसर, पिसर्वे, नायगाव, धालेवाडी येथील स्थानिक निवडक नागरिक, पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिक व पदाधिकार्‍यांकडून सुचवण्यात आलेल्या पर्यायांवर सविस्ततर चर्चा करण्यात आली होती. वाल्हे येथील सुकलवाडी फाटा येथील रेल्वेच्या भुयारी मार्गात येथून पुढच्या काळामध्ये नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची ग्वाही देण्यात आली होती.

--

फोटो क्रमांक : १२ वाल्हे भुयारी मार्ग ॉ

फोटो ओळी : भुयारी मार्गाची पाहणी करताना प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवा, महादेव चव्हाण आदी.

120821\12pun_2_12082021_6.jpg

फोटो क्रमांक : १२ वाल्हे  भुयारी मार्ग ॉफोटो ओळी : भुयारी मार्गाची पाहणी करताना प्रा. डॉ. दिगंबर दुगार्डे, सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवा, महादेव चव्हाण आदी

Web Title: The problem of Santwalhe Sukalwadi railway gate underpass will be solved forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.