आंबिल ओढ्यातील त्या ३८ झोपड्यांचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:10+5:302021-07-02T04:09:10+5:30

पुणे : दांडेकर पूल येथील आंबिल ओढ्यालगतच्या सर्व्हे. १३५ प्लॉट क्र. २८ मधील त्या ३८ झोपड्यांचा प्रश्न मार्गी लागला ...

The problem of those 38 huts in Ambil stream is solved | आंबिल ओढ्यातील त्या ३८ झोपड्यांचा प्रश्न मार्गी

आंबिल ओढ्यातील त्या ३८ झोपड्यांचा प्रश्न मार्गी

Next

पुणे : दांडेकर पूल येथील आंबिल ओढ्यालगतच्या सर्व्हे. १३५ प्लॉट क्र. २८ मधील त्या ३८ झोपड्यांचा प्रश्न मार्गी लागला असून, या झोपडपट्टीधारकांनी स्वत:हून जागा रिक्त करून देण्याबाबतची तयारी दर्शविली आहे.

आंबिल ओढ्यातील बाधित होणाऱ्या झोपडपट्टीमधील पात्र निवासी झोपडीधारकांच्या पुनर्वसनाकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत स्थानिक नगरसेवक, एसआरएचे प्रमुख राजेंद्र निंबाळकर, झोपडपट्टीधारक यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सर्व्हे. १३५ प्लॉट क्र. २८ मधील झोपडीधारकांनी त्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी व पुढील पंधरा दिवसात त्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

याचबरोबर, ओढ्यातील बाधित क्षेत्रामध्ये असलेल्या ३८ झोपड्यांविरुध्द न्यायालयाच्या निर्देशानुसार व झोपडपट्टीधारकांच्या संमतीशिवाय पुढील कारवाई करण्यात येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले, तर आंबिल ओढाबाधित क्षेत्रातील इतर सुमारे ६०० झोपडीधारकांचे पुनर्वसन प्रकल्पातच पुनर्वसन करण्याचे आश्वासन केदार असोसिएटस कडून देण्यात आले आहे. दरम्यान यावेळी त्या ३८ झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या नालाबाधित झोपड्या स्वत:हून खाली करून देण्याचेही मान्य केले आहे.

आंबिल ओढ्याची पाहणी करून येथील झोपडपट्टीमधील अस्तित्वात असलेल्या नाला सरळीकरण व त्याच्याशी निगडित पर्यावरण व अन्य तांत्रिक मुद्द्यांबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे व महापालिका आयुक्त यांच्या सोबत पाहणी करून व बैठक घेऊन पुढील निर्देश देणार असल्याचेही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाने कळविले आहे.

--------------------------

Web Title: The problem of those 38 huts in Ambil stream is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.