समस्यांचे बसथांबे!

By admin | Published: October 15, 2015 12:52 AM2015-10-15T00:52:29+5:302015-10-15T00:52:29+5:30

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे.

Problems Bus! | समस्यांचे बसथांबे!

समस्यांचे बसथांबे!

Next

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. अनेक बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधा नाही. ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी महामंडळ अपयशी ठरले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असणारे महामंडळ प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ‘लोकमत’ने गावोगावच्या बसस्थानकांचा घेतलेला आढावा...
डोर्लेवाडी : झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी या गावांमधील प्रवाशांना
बस स्थानकाची सोय नसल्याने भरउन्हामध्ये व पावसामध्ये थांबावे लागते.
बारामती-कळंब हा तीर्थक्षेत्रासाठी जाणारा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर रहदारी जास्त असते. तीर्थक्षेत्रासाठी जाणाऱ्या बसची सोयसुद्धा आहे. परंतु, झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी या गावांमध्ये प्रवाशांना थांबण्यासाठी बस स्थानक नसल्याने भरउन्हामध्ये, तसेच पावसाळ्यात पावसामध्ये उभे राहावे लागते.
प्रवासी झाडाच्या सावलीत बाजूला उभा राहिला, तर बस दिसत नाही. चालक थांब्यावर कोणी नसल्याने बस न थांबवता जातात, असे अनेक वेळा घडले आहे.
भरउन्हामध्ये, पावसामध्ये उभे राहावे लागते. यासाठी वरील सर्व ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर बस स्थानकाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
याअगोदर पदाधिकाऱ्यांनी ते केले नाही. माझा सरपंचपदाचा दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे, असे सांगितले. झारगडवाडीच्या सरपंच अनिता लांडगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बस स्थानक बांधलेले आहे. हे बस स्थानक चौकाच्या बाहेर आहे. तिथे बसण्यासाठी कुठलाच प्रवासी जात नाही. ते बांधून काय उपयोग? जिथे बसची वाट पाहत प्रवासी थांबतात तिथे बस स्थानक नाही. वरील गावांमध्ये बस स्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.-नामदेव लाड, सरपंच, गुणवडी

Web Title: Problems Bus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.