शहराच्या स्वच्छतेला निवडणुकीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:23 PM2019-04-20T12:23:31+5:302019-04-20T12:29:14+5:30

महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते.

problems to cleanliness of the city due to Elections | शहराच्या स्वच्छतेला निवडणुकीचा फटका

शहराच्या स्वच्छतेला निवडणुकीचा फटका

Next
ठळक मुद्देरस्त्यावरील झाडन कामांच्या टेंडरची मुदत संपलीआयोगाकडून टेंडर प्रक्रियेला परवानगी न मिळाल्यास कर्मचा-यांचे पगार रखडणार आहे. 

पुणे: शहरामध्ये झाडन कामाच्या टेंडरची मुदत ३१ मार्च रोजीच संपली आहे. या कामासाठी नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे, परंतु सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे झाडन कामांची टेंडर प्रक्रिया रखडली असून, याचा शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे. 
महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी दरवर्षी प्रशासनाकडून टेंडर काढले जाते. त्यानंतर ठेकेदारामार्फत हे कर्मचारी नियुक्ती केले जाते. सध्या हापालिकेच्या वतीने सर्व रस्ते, उद्याने व अन्य सर्वाजनिक ठिकाणी स्वच्छता, झाडन काम करण्यासाठी दररोज तब्बल ३ हजार ७०० कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. परंतु ३१ मार्च रोजी या झाडन कामाच्या टेंडरची मदुत संपली आहे. यामुळे या कंत्राटी कर्मचा-यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबात महापालिका प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवला असून, झाडन कामाची टेंडर प्रक्रिया तातडीने राबविण्यासाठी परवानी मागितली आहे. परंतु अद्यापही ही परवानगी मिळालेली नाही. यामुळे याचा मोठा परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होऊ लागला आहे.  यामध्ये पुन्हा टेंडर मिळेल, या अपेक्षेन अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदारांकडून काम सुरू ठेवले आहे. परंतु आयोगाकडून टेंडर प्रक्रियेला परवानगी न मिळाल्यास कर्मचा-यांचे पगार रखडणार आहे. 
------------------------
गाडीखान रुग्णालयातही कच-याचा प्रश्न
गाडीखाना येथील सफाई कामगार आठ-दहा दिवसांपासून रजेवर गेल्याने गाडीखान रुग्णालयात स्वच्छताच होत नाही. येथे बदली कर्मचारी नियुक्त केली नसल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. याबाबत आरोग्य अधिका-यांकडे तक्रार केल्यानंतर आठ दिवसांनंतर रुग्णालयात स्वच्छता करण्यात आली.

Web Title: problems to cleanliness of the city due to Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.