खंडित वीजपुरवठ्याची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:27 AM2018-08-29T02:27:58+5:302018-08-29T02:28:15+5:30
बावधनचे नागरिक त्रस्त : सोसायटी अध्यक्ष व सचिवांच्या चर्चासत्रात मांडली गाऱ्हाणी
कर्वेनगर : प्रभाग क्र. १० बावधन कोथरूड डेपोमधील बावधन येथे काही दिवसांपासून रहिवासी वारंवार होत असलेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. सतत होत असणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येवर मात करण्याकरिता या भागात कार्यरत असणारे महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत चर्चा करण्याकरिता तसेच महावितरणबाबत असणाºया सर्व समस्या मांडता याव्यात, याकरिता स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी परिसरातील सर्व सोसायट्यांचे चेअरमन तसेच सेक्रेटरी यांच्यांसह चर्चासत्र आयोजित केले.
यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये बहुतांश नागरिकांना सतत होत असणारा खंडित वीजपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. तसेच, यामुळे जनरेटर चालवावा लागत असल्याने खर्चदेखील वाढत असल्याचे निदर्शनास आणले. वेळोवेळी मीटर रीडिंग घेत नसल्याने प्रत्येक वेळी कमीजास्त बिल येणे, नादुरुस्त मीटर असल्याचा दावादेखील नागरिकांनी केला. यावर नगरसेवक दिलीप वेडे-पाटील यांनी नागरिकांना होत असणाºया त्रासातून महावितरण मार्फत कोणतीही उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारादेखील केला आहे. तसेच, सबस्टेशन उभारण्याकरिता लागत असणारी जागादेखील पुणे महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असेदेखील वेडे-पाटील म्हणाले.
एमएसईबीचे कार्यकारी अभियंता लहामगे यांनी निर्माण होत असलेल्या समस्या का उद्भवत आहेत, याची सविस्तर माहिती दिलीय यामध्ये बावधन परिसरामध्ये उपलब्ध नसणारे सबस्टेशन, जुन्या विद्युतवाहिन्या अशा अनेक समस्या आहेत की, त्यामुळे या परिसरात खंडित वीजपुरवठा होत असल्याचे लहामगे यांनी सांगितले. परंतु, येत्या एका महिन्यात या सर्व बाबींवर उपाययोजना करण्यात येईल, असेदेखील सांगितले. परिसरात भेडसावत असणाºया खंडित वीजपुरवठाबाबत नगरसेवक दिलीप वेडे-पाटील यांनी आगळ्यावेगळ्या चर्चासत्राचे आयोजन केले असल्याने उपस्थित सर्व नागरिक समाधानी झाल्याचे दिसले. यावेळी एमएसईबीचे कार्यकारी अभियंता श्री. लहामगे, अतिरिक्त अभियंता मुंडे व कनिष्ठ अभियंता वाघमारे उपस्थित होते.