राजकारणापेक्षा जनतेच्या अडचणी अधिक महत्त्वाच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:39+5:302021-04-17T04:11:39+5:30
पुणे : कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ऑक्सिजन , व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध होत नाहीत. सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी, ...
पुणे : कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ऑक्सिजन , व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध होत नाहीत. सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, असे मत आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केले.
बालेवाडी येथील उमरजी मदर अँण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, नगरसेवक बाबूराव चांदेरे उपस्थित होते.
चांदेरे म्हणाले, की राजकीय चमकोगिरीची ही वेळ नसून नागरिकांना मदत करणे, त्यांची समस्या दुर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय मतभेद दूर करून जनतेच्या हितासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. तर, डॉ. बालवडकर म्हणाले, लसीकरणाची सोय व्हावी म्हणून बालेवाडीत मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहे. याचा फायदा सर्व नागरिकांना मोठया प्रमाणात होणार आहे.
यावेळी माजी सरपंच गणपतराव बालवडकर, अंकुश बालवडकर, विकास कामत, नितीन मेटकर, सारंग वाबळे, डॉ. संतोष मुळे, डॉ. गणेश डमाळे, डॉ. मुक्ता उमरजी, डॉ. राजेश देशपांडे, राखी श्रीराव, प्राची सिद्दीकी, वर्षा माळी आदी उपस्थित होते.