साखर कारखान्यातील वाया जाणाऱ्या पाण्यावर होणार प्रक्रिया

By Admin | Published: March 28, 2017 02:35 AM2017-03-28T02:35:45+5:302017-03-28T02:35:45+5:30

येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग

The process of going to the wasted water of the sugar factory | साखर कारखान्यातील वाया जाणाऱ्या पाण्यावर होणार प्रक्रिया

साखर कारखान्यातील वाया जाणाऱ्या पाण्यावर होणार प्रक्रिया

googlenewsNext

बेल्हा : येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग या विद्याशाखेतील विद्यार्थी विनायक कांदळकर याने पर्यावरणपूरक असा एक प्रकल्प तयार केला आहे. साखर कारखान्यातील वाया जाणाऱ्या पाण्यावर कमी खर्चात प्रक्रिया करणारा प्रकल्प असे या प्रकल्पाचे नाव आहे. नावाप्रमाणेच हा प्रकल्प अत्यंत कमी खर्चिक असा आहे.
तिचा वापर करून साखर कारखान्यातून प्रक्रियेद्वारे निघणारा चोथा व त्याची झालेली राख, वाळलेल्या शेवग्याच्या शेंगेच्या बियांपासून तयार केलेली पावडर या सर्वांचे मिश्रण एका छोट्या टँकमध्ये ठेवलेल्या दूषित पाण्याबरोबर केले जाते. टँकमध्ये शेवाळ आणि दूषित पाणी यांचे मिश्रण १२ तास सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर व साखर कारखान्यातून प्रक्रियेद्वारे निघणारा चोथा व त्याची झालेली राख आणि वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांच्या बियांपासून तयार केलेली पावडर यांचे मिश्रण टँकमधील दूषित पाणी सूर्यप्रकाशात २४ तास ठेवल्यानंतर त्या दूषित पाण्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून आले. सूर्यप्रकाशामुळे या पाण्यामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण ९० ते ९५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले व त्यामध्ये घाण, कचरा कुजून तळाशी जाऊन बसतो. वर राहिलेले स्वच्छ पाणी शेतीसाठी व इतर कामासाठी आपण वापरू शकतो. कारखान्यातून निघणाऱ्या चोथ्यापासून निर्माण झालेली राख ही अत्यंत हानिकारक असते.
राखेमध्ये असणारे सिलिका नावाचे मूलद्रव्य जर पाण्याच्या संपर्कात आले तर ते पाणी शरीराला घातकारक व अपायकारक ठरते. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमाप्रमाणे कारखान्यातून निघणारे दूषित पाणी शेतीला वापरू शकत नाही. परंतु या प्रकल्पाद्वारे सदर शुद्धीकरण केलेले पाणी व त्याचे अहवाल महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणार असल्याचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रवीण सातपुते व प्रा. नितीन खाटमोडे, प्रा. महेश खोसे यांनी सांगितले आहे.
हा प्रकल्प तयार करण्यासाठी या विद्यार्थ्याने १५ संशोधन पेपरांचा अभ्यास करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्सचा अभ्यास केलेला आहे. आतापर्यंत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर, शरदचंद्र कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ओतूर, जी. एच. रायसोनी पॉलिटेक्निक नगर, जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग कुरण, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी, जे. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली, जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली आदी महाविद्यालयांतून राज्य स्तरावर, राष्ट्रीयस्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या प्रकल्पाला प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे.
संशोधन व विकास याविषयी संस्था नेहमीच पुढाकार घेऊन त्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, संस्थेचे सचिव विवेक
शेळके, डॉ. अण्णासाहेब गोजे, डॉ. दीपराज देशमुख, प्रा. प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
आहे. (प्रतिनिधी)

४साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
४साखर कारखान्यामध्ये विविध प्रक्रियेदरम्यान प्रतिदिन सुमारे ४० ते ५० लाख लिटर पाण्याचा वापर होतो. त्यापैकी अंदाजे ३० ते ४० लाख लिटर पाणी वाया जाते.

४हे वाया जाणारे पाणी दूषित असल्याकारणाने इतरत्र कुठेही आपण वापरू शकत नाही. पाणी शुद्धीकरण यंत्रणेद्वारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत पाणी
शुद्ध होते.
४उरलेले ४० टक्के पाणी जमिनीवर सोडून द्यावे लागते. परिणामी परिसरातील जमीन, विहीर व प्राणिमात्र यांना हानी पोहोचते.

४यावर उपाय म्हणून दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे उपलब्ध होणाऱ्या व टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थांचा वापर करून हे सर्व टाळता येणे शक्य असल्याचे विनायक कांदळकर म्हणाला. शेवाळ ही वनस्पती दूषित पाण्याच्या ठिकाणी असते.

Web Title: The process of going to the wasted water of the sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.