पुणे पोलीस दलात लोणीकंदच्या समावेशाची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:30+5:302021-03-22T04:09:30+5:30
वाघोली : लोणीकंद(ता:हवेली)पोलीस स्टेशन हे मनुष्यबळासह पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट करण्यास शासन मान्यता मिळाली असल्याने पुणे शहर ...
वाघोली : लोणीकंद(ता:हवेली)पोलीस स्टेशन हे मनुष्यबळासह पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट करण्यास शासन मान्यता मिळाली असल्याने पुणे शहर पोलीस दलाकडून समावेशाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे.येत्या रविवार किंव्हा सोमवारी या दोन दिवसांमध्ये लोणीकंद पोलीस स्टेशन शहर पोलीस दलातून कार्यरत होणार असल्याची जोरदारपणे चर्चा आहे.कायदेशीर प्रक्रिया व पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार मागील तीन महिन्यांपासून लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस हद्दीत समाविष्ट होण्याची रखडलेली प्रक्रिया पूर्ण झाली असून १६ मार्च रोजी राज्याच्या गृहविभागाने आदेश काढून दोन्ही पोलीस स्टेशनच्या समावेशाला शासन मान्यता दिली आहे. समावेशाच्या आदेशानंतर पुणे शहर पोलीस दलाकडून समावेशाची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. पुणे झोन ४ चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भेट देऊन आवश्यक प्रक्रीयेबाबत माहिती घेऊन व समावेशा बाबतची कार्यवाही केली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये (रविवार, सोमवार) लोणीकंद पोलीस स्टेशनचा कार्यभार पुणे शहर पोलीस हद्दीतून कार्यरत होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
पुणे पोलीसा समोरील आव्हाने
लोणीकंद पोलिस स्टेशनला वाढीव मनुष्यबळामुळे सततची होणारी वाहतूक कोंडीतुन मुक्तता होईल रोडवरच दर मंगळवारी भरणारा आठवडी बाजार व अस्तव्यस्त पार्किंग, रॉंग साईड न येणारी वाहने, टॅक्सी, सिक्स सीटर ,छोटे रिक्षा यांनी चालवलेला रस्त्यातच थांबण्याचा मनमानी कारभार ,रोडलगत व फुटपाथवर झालेले अतिक्रमणे याला आळा बसेल.मांजरी खुर्द, वाडेबोल्हाई, आष्टापुर फाटा, आळंदी फाटा, केसनंद गाव, खांदवे नगर,बीजेएस चौक,अश्या ठिकाणी पोलीस चौक्या उभारल्या जातील.यामुळे सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळेल. छोटे मोठे अपघात,चोऱ्यामाऱ्या ,घरफोड्या,छोटे-मोठे वाद-विवाद विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक कोंडी मुळे अडचण.जागोजागी चौकी यामुळे व पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याकारणाने सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांची मदत मिळेल यातून सर्व समस्या सुटतील असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
******************
लोणीकंद पोलीस स्टेशन शहर हद्दीत समावेशाची प्रक्रिया सुरु केली असून लवकरच येत्या दोन ते तीन दिवसात कार्यवाही पूर्ण होईल.
पंकज देशमुख, उपायुक्त,४झोन पुणे.