ई-पीक पाहणी नोंदी करण्याची पध्दत अतिशय सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:45+5:302021-09-19T04:12:45+5:30

घोडेगाव : शेतातील पीक पाहणीची नोंद आपल्या सातबाऱ्यांवर असल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो यासाठी आंबेगावमधील ...

The process of making e-crop survey records is very simple | ई-पीक पाहणी नोंदी करण्याची पध्दत अतिशय सोपी

ई-पीक पाहणी नोंदी करण्याची पध्दत अतिशय सोपी

Next

घोडेगाव : शेतातील पीक पाहणीची नोंद आपल्या सातबाऱ्यांवर असल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो यासाठी आंबेगावमधील शेतकऱ्यांनी अतिशय सोप्या पध्दतीने मोबाइलवर करता येणाऱ्या ऑनलाइन पीक पाहणीची नोंद करून घ्यावी, असे आवाहन प्रांत अधिकारी सारंग कोडूलकर यांनी केले आहे.

पिंपळगांव घोडे (ता. आंबेगाव) येथे हिराबाई काळे यांच्या बांधावर जाऊन आंबा पिकाची ऑनलाइन पीक पाहणी नोंद करण्यात आली. यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडूलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सारंगा कोडूलकर यांनी सांगितले की, शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी नोंदीमध्ये शेतकरी आपल्या मोबाइलवर ॲप डाऊनलोड करून स्वत:ची पीक पाहणी स्वत: करू शकतात. यासाठी मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल हे मदत करतील. यावेळी प्रांत अधिकारी यांनी मोबाइलवर कशा पध्दतीने पीक पाहणी नोंदवावी, हे देखील समजून सांगितले.

--

फोटो क्रमाक : १८घोडेगाव पीक पाहणी

फोटो ओळी : पिंपळगांव घोडे येथे हिराबाई काळे यांच्या शेताच्या बांधावर पीक पाहणी नोंद करण्यासाठी उपस्थित सारंग कोडूलकर, रमा जोशी, जालिंदर पठारे.

Web Title: The process of making e-crop survey records is very simple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.