देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालिचाची पुण्यात निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 04:05 PM2022-11-06T16:05:33+5:302022-11-06T16:05:40+5:30

१००० स्क्वेअर फूट पासपालम ग्रास गालिचाची जागतिक स्तरावर घेतली जात आहे नोंद

Production of the country largest natural grass carpet in Pune | देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालिचाची पुण्यात निर्मिती

देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालिचाची पुण्यात निर्मिती

Next

पुणे : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणाचा प्रसार व्हावा. यासाठी देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालीच्याची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या १००० स्क्वेअर फुट गालिच्याची जागतिक स्तरावरही नोंद घेतली जात आहे. प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीच्या जिबॉय तांबी यांनी पुणे सोलापूर रस्त्यालगत कुंजीरवाडी येथे हा प्रकल्प उभारला आहे.

यामध्ये नैसर्गिक रित्या पर्यावरण पूरक गवतापासून गालिचा तयार करण्यात आला आहे. हा गालिचा केवळ घरामध्येच नव्हे तर मोठ्या स्तरावर क्रीडांगणामध्ये, उद्यानांमध्ये, गोफ कोर्समध्ये, घराच्या परसबागेमध्ये ही वापरता येऊ शकतो. हा गालिचा वापरण्यासाठी ही अतिशय सोपा असून तसेच देखभाल खर्च ही अतिशय कमी आहे. दोन ते तीन दिवसातून एकदा या गालिच्याला पाणी दिले तरी हा गालिचा अत्यंत हिरवागार आणि टवटवीत राहतो.

 हा पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर तर आहेच तसेच शारीरिक दृष्ट्या ही याचे अनेक फायदे आहेत. या गालीच्या वर चप्पल न घालता चालले तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोग होतो. या प्रकल्पामधून शेतकऱ्यांना तसेच तरुणांनाही उद्योग आणि व्यवसाय निर्मितीसाठी मदत होऊ शकेल यामधून स्थानिक तरुणांनाही रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. काळ्या मातीत बरोबर समुद्रालगत असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या आणि कोकणातील लाल मातीतही अत्यंत चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते.
 
''कमी पावसाच्या तसेच जास्त पावसाच्या प्रदेशातही चांगल्या प्रमाणात वाढतो. पावसाचे प्रमाण अधिक असेल तरीही या गालिचामधून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही. नैसर्गिकरित्या तयार करण्यात आल्याने या गालिचामध्ये कोणत्याही विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य होऊ शकत नाही. त्यामुळे हा घरामध्ये आणि बागेमध्येही अतिशय संरक्षित दृष्ट्या वापरता येऊ शकतो. पुण्यासह केरळ मधील कोचीन आंद्र प्रदेश येथील हैदराबाद या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर या गालीचाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये घरपोच हा गालिचा पर्यावरण प्रेमींपर्यंत पोहोचवण्याची सोयही करण्यात आल्याचे जिबॉय तांबी यांनी माहिती यांनी दिली.'' 

Web Title: Production of the country largest natural grass carpet in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.