जैविक कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:30 AM2018-03-17T00:30:26+5:302018-03-17T00:30:26+5:30

मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे.

Production of organic manure from biological waste | जैविक कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती

जैविक कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती

Next

पुणे : मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे. तिने जैविक कचºयापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती करण्याचा उपाय शोधून काढला आहे.
तिच्या या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत दुसºया क्रमांकाचे पारितोषिक अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील आर्टस सायन्स कॉमर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात (एफवाय बीएस्सी) शिकणाºया चैताली पोपट क्षीरसागर हिने याबाबतचे संशोधन केले आहे. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे आणि त्यांच्याकडे संशोधन करणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या मारकड यांनी मार्गदर्शन केले. ती गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर काम करत आहे. तिच्या संशोधनात जैविक कचयापासून द्रवरूप खत तयार केले जाते. हे खत पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. ते द्रवरूप असल्याने वापरण्यासाठीही सोयीचे ठरते. तसेच, कचºयाची समस्यासुद्धा आपोआप निकाली लागते.
चैतालीने संशोधनाद्वारे कचरा जिरविण्यासाठी एक प्रक्रिया व उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या जैविक कचºयाचे (फळे, भाजीपाला, पालापाचोळा, हाडे, उरलेले अन्न) रूपांतर द्रवरूप खतात करणे शक्य होते. त्यासाठी केवळ आठवड्याभराचा काळ लागतो. त्यानंतरही साधारण ३० टक्के पदार्थ मागे उरतात. त्याचे एकाच दिवसात खतात रूपांतर करता येते. या प्रक्रियेत कचºयाचे तुकडे केले जातात. त्याच्यावर गरम पाण्याची क्रिया केली जाते आणि काही जिवाणू वापरले जातात. त्यामुळे ही क्रिया वेगाने घडून येते.
राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय संशोधन, नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्पांच्या सादरीकरणाची स्पर्धा याच आठवड्यात हरियानामधील अंबाला येथील चित्करा विद्यापीठात पार पडली. त्यामध्ये १५ राज्यांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

Web Title: Production of organic manure from biological waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.