आषाढी एकादशीनिमित्त ‘माझे विठ्ठल रखुमाई’ या गीताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:29+5:302021-07-20T04:08:29+5:30

पुणे : आषाढी एकादशीचे औचित्य साधत स्वरनील एंटरटेनमेंट्सचे नीलेश माटे यांच्या वतीने ‘माझे विठ्ठल रखुमाई’ या ...

Production of the song 'Maazhe Vitthal Rakhumai' on the occasion of Ashadi Ekadashi | आषाढी एकादशीनिमित्त ‘माझे विठ्ठल रखुमाई’ या गीताची निर्मिती

आषाढी एकादशीनिमित्त ‘माझे विठ्ठल रखुमाई’ या गीताची निर्मिती

Next

पुणे : आषाढी एकादशीचे औचित्य साधत स्वरनील एंटरटेनमेंट्सचे नीलेश माटे यांच्या वतीने ‘माझे विठ्ठल रखुमाई’ या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. या गीताचा प्रीमियर स्वरनील एंटरटेनमेंट्सच्या युट्यूब पेजवरून करण्यात आला. यावेळी गीताचे गायक राहुल देशपांडे, अभिनेते राहुल सोलापूरकर, आनंद इंगळे, नीलेश माटे, युवा संगीतकार सुयश खटावकर, गीतकार देवदत्त भिंगारकर, संगीत संयोजक तेजस चव्हाण आदी उपस्थित होते.

सोपे शब्द आणि सहज लक्षात राहणारी चाल या दोन गोष्टी कोणत्याही गाण्याचा आत्मा असतो. याच दोन्ही गोष्टींचा मिलाफ झाल्याने माझे विठ्ठल रखुमाई हे गीत नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास राहुल देशपांडे यांनी व्यक्त केला.

नीलेश माटे म्हणाले, विठूरायाचे प्रत्यक्ष दर्शन सध्या घेता येत नसल्याने हे स्वरदर्शन भक्तांना आनंद देईल. स्वर शब्दांच्या माध्यमातून विठ्ठलाची आणि त्याच्या भक्तांची केलेली ही सेवा नक्कीच सगळ्यांना मोहिनी घालेल. विठ्ठलाचे स्वरूप श्रीरंगाचे आहे, आम्ही भावरंगातून पूजा बांधत आहोत.

---------------------------------------------------------

Web Title: Production of the song 'Maazhe Vitthal Rakhumai' on the occasion of Ashadi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.