प्रा.डॉ.चंद्रकांत मंडलिक यांना यु.एस.ए.ची डी.लिट पदवी
By admin | Published: January 20, 2017 05:04 PM2017-01-20T17:04:26+5:302017-01-20T17:04:26+5:30
श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.चंद्रकांत मंडलिक यांना इंग्रजी विषयातील विशेष योगदानाबद्दल अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिकेने डी.लिट देऊन सन्मानित केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जुन्नर, दि. 20 - श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.चंद्रकांत मंडलिक यांना इंग्रजी विषयातील विविध स्तरावर व सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिकेने डी.लिट पदवी देऊन सन्मानित केले आहे.
प्रा.डॉ.चंद्रकांत मंडलिक ३० वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून त्यांनी पुणे विद्यापीठ इंग्रजी अभ्यास मंडळ, परीक्षा विभाग, प्राध्यापक निवड समिती, एल.आय.सी.कमिटीत चेअरमन व सदस्य म्हणून काम केले असून त्यांची इंग्रजी विषयातील पुस्तके “१२ इंग्लिश पोएट्स” “द स्ट्रक्चरल इनजिनिअरिग आर्ट आँफ कँरँकटराझेषण” “ द थिमँटीक स्ट्रक्चरल” इ.पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांना आतापर्यंत ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयावर संशोधनपर लेख सादर केले असून आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून २० लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रा.डॉ.चंद्रकांत मंडलिक यांनी जपानची राजधानी टोकियो येथे “स्टडी आँफ कल्चर विथ रेफरन्स टू इंडियन इंग्लिश फिक्शन” व श्रीलंका (कोलंबो)येथे “ द टीचिंग आँफ कल्चर थ्रू कार्टून फिल्मस” या विषयावर व्याख्याने दिली असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परीक्षांमध्ये अध्यक्ष व व्याख्याते म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
फंक्शनल इंग्लिश कोर्स व स्पोकन इंग्लिश कोर्स त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्याला आदिवासी मुलांना व मुलीना होणा-या फायद्यातून अनेक विद्यार्थी शैक्षणिक सहकारी ,फॉरेस्ट,पोलीस,महसूल व बँक क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहेत.
मा.नरेंद्र जाधव कुलगुरू पुणे विद्यापीठ यांची समाजभिमुख शिक्षण व शेतक-यासाठी कृषी संजीवनी प्रा.डॉ.चंद्रकांत मंडलिक यांनी निरगुडे व वडगाव सहानी ही गावे दत्तक घेवून राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत रस्ते बांधणी ,मातीचे बंधारे,वृक्षारोपण,मोतीबिंदू आँपरेशन,महिला आरोग्य तपासणी इ.योजना राबवून जनजागृती घेण्याच्या दृष्ठीकोनातून महिला सबलीकरण,सेंद्रिय शेती,अंधश्रद्धा निर्मुलन,शिक्षणाचे महत्त्व,नदीनाले जोडप्रकल्प इ.विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली.
तसेच वडगाव सहानी गाव हगणदारीमुक्त होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे हिवाळी कॅम्प घेवून विविध समाजभिमुख प्रकल्प त्या गावात राबविले. प्रा.डॉ.चंद्रकांत मंडलिक यांना मिळालेल्या डी.लिट.सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड.संजय शिवाजीराव काळे,संस्था पदाधिकारी ,संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी,प्राचार्य.डॉ.भास्कर शेळके ,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थांनी अभिनंदन केले.