भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या कुलपतीपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 07:30 PM2018-06-18T19:30:33+5:302018-06-18T19:30:33+5:30
प्रा.डॉ. शिवाजीराव कदम दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम पाहिले.
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपतीपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली. भारती विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कदम यांनी कुलपती पदाचा पदभार नुकताच स्वीकारला.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित असलेले प्रा.डॉ. शिवाजीराव कदम गेली तीन दशकाहून अधिक काळ अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वर्षे भारती विद्यापीठाच्या पुना कॉलेज आॅफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषविले. दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम पाहिले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ आणि विद्वत सभेचे सदस्य होते. प्रा. डॉ. कदम विद्यापीठ अनुदान मंडळाचे सहा वर्षे सदस्य होते. तसेच अनेक विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत.