डीपीची मुख्य वायर हातात घेऊन रागाच्या भरात प्राध्यापकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:50+5:302021-04-16T04:11:50+5:30
पुणे : विजेच्या डीपीचे दार उघडून मुख्य वायर हातात पकडत एका प्राध्यापकाने आत्महत्या केल्याचा भीषण प्रकार विधि महाविद्यालय ...
पुणे : विजेच्या डीपीचे दार उघडून मुख्य वायर हातात पकडत एका प्राध्यापकाने आत्महत्या केल्याचा भीषण प्रकार विधि महाविद्यालय रस्त्यावर घडला. केरळमधील एका आर्किटेक्चर कॉलेजमधील हा माजी सहायक प्राध्यापक आहे.
विधि महाविद्यालय रस्त्यावरील वि. स. खांडेकर चौकात जर्मन बेकरीसमोर दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली? आहे. किरण राजकुमार (वय ३२, रा. त्रिवेंद्रम, केरळ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे झालेल्याचे नाव आहे. किरण राजकुमार हे केरळमधील आर्किटेक्चर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करीत होते. हे त्यांच्याजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून कळले. त्या ठिकाणी फोन केला असता सहा महिन्यांपासून त्यांची वर्तणूक ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. ते पुण्यात कसे आले माहिती नाही.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हा व्यक्ती दुपारी रागाच्या भरात काहीतरी बडबडतच येताना दिसला. त्यांनी डीपी उघडला आणि त्यातली वायर त्यांनी हातात घेतली. पायात बूट असल्यामुळे ते भाजले नसावेत, असा अंदाज आहे. मात्र जबरदस्त शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मोबाइलमध्ये शोध घेतला असता त्यांनी शेवटचा कॉल हा वडिलांना केल्याचे दिसले. त्यांनी आत्महत्या का केली? याचा तपास अजून लागलेला नसल्याचे तपास अधिकारी संदीप जाधव यांनी सांगितले.