प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:45+5:302021-01-13T04:23:45+5:30
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांनी १ मार्च २०१३ ते १० मे २०१३ या कालावधीमध्ये परीक्षा कामकाजावर बहिष्कार घताला. शासनातर्फे ...
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांनी १ मार्च २०१३ ते १० मे २०१३ या कालावधीमध्ये परीक्षा कामकाजावर बहिष्कार घताला. शासनातर्फे या कालावधीचे वेतन प्राध्यापकांना अदा करण्यात आले नव्हते. मात्र, न्यायालयाने शासनाला प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत आदेश दिल्यानंतर शासनाने संप काळातील वेतन देण्यास मंजूरी दिली. त्यानुसार पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना दिल्या जाणा-या एकूण रक्कमेची माहिती प्रसिध्द केली आहे. तसेच वेतन वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने विवरणपत्रक प्रसिध्द केले असून त्यात प्रत्येक महाविद्यालयाला द्याव्या लागणा-या रक्कमेची माहिती प्रसिद्ध केली आहे. पुणे शहरातील स.प.महाविद्यालयाला सर्वाधिक एकूण १ कोटी ३८ लाख १० हजार २१४ रुपये मंजूर केले आहेत. तसेच शिवाजीनगर मॉडर्न महाविद्यालयास ८६ लाख ११ हजार ६६२ रुपये,आण्णासाहेब मगर महाविद्यालयाला ७५ लाख ५८ हजार ४७१ रुपये रक्कम मंजूर केली आहे.
-----------------------------------
तब्बल सात वर्षानंतर प्राध्यापकांना त्यांच्या वेतनाची रक्कम मिळत आहे,याबाबत शासनाचे आभार आहे. परंतु, न्यायालायाने व्याजासहीत रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र,उच्च शिक्षण विभागाकडून रक्कमेचे व्याज दिले जात नाही, यामुळे प्राध्यापकांमध्ये नाराजी आहे.
- एस.एम.राठोड, अध्यक्ष ,पुटा