श्रीराम पतसंस्थेला १ कोटी ८० लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:34+5:302021-04-23T04:11:34+5:30
कोरोनाच्या बिकट परिस्थिती असताना संस्थेने समाधानकारक प्रगती केली आहे. संस्थेच्या ८ शाखा व मुख्य कार्यालय कार्यरत असून एकूण ...
कोरोनाच्या बिकट परिस्थिती असताना संस्थेने समाधानकारक प्रगती केली आहे. संस्थेच्या ८ शाखा व मुख्य कार्यालय कार्यरत असून एकूण ठेवी १२६ कोटी ४४ लाख असून एकूण कर्जवाटप ८७ कोटी २२ लाख, एकूण व्यवसाय २१३.६६ कोटी इतका, तर संस्थेचे खेळते भांडवल १४४.८० कोटी असुन एकूण स्वनिधी १०.१४ कोटी, गुंतवणूक ४७ कोटी ३० लाख आहे. सर्व तरतुदी पश्चात संस्थेस १० लाख ११ हजार इतका निव्वळ नफा संस्थेस झाला आहे. संस्थेची सभासद संख्या ७४४५ असून वसूल भागभांडवल ४ कोटी ८४ लाख १६ हजार ८५५ इतके आहे . संस्थेच्या सर्व शाखांमधे सोनेतारण कर्ज, वीजबिल भरणा, एन.ई.एफ.टी ,आर.टी.जी.एस. सुविधा व सर्व शाखांचा कारभार कोअर बँकिंग प्रणालीमध्ये आहे. संस्थापक माजी आमदार वल्लभ बेनके व आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक अमित बेनके, विजय घोगरे, अनिल डेरे, नवनाथ चौगुले, ज्ञानेश्वर रासने, शशिकांत वाजगे, अनिल थोरात, यल्लू लोखंडे, राजश्री बेनके, शीला मांडे, सीताराम पाटे, अमिर तांबोळी यांच्या सहकार्याने संस्था सभासदांना दिवाळी भेटवस्तूसह लाभांश देऊन कोरोनाकाळात आर्थिक दुर्बल घटक, कामगार यांना घरोघरी २ महिने जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम केले आहे, संस्थेने सर्व सभासदाना २ लाख अपघाती विम्याचे संरक्षण दिलेले आहे, अशी माहिती मुख्य व्यवस्थापक शाम आर्विकर यांनी दिली.