प्राध्यापकाच्या कानशिलात भडकावली, कॉपी पकडल्याचा राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:06 AM2017-10-26T01:06:30+5:302017-10-26T01:06:41+5:30
इंदापूर : विद्यापीठाच्या परीक्षेत पेपरची कॉपी पकडल्याचा राग धरून विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार बुधवारी (दि. २५) सकाळी पावणेअकराच्या सुमारास येथील इंदापूर महाविद्यालयाच्या आवारात घडला.
इंदापूर : विद्यापीठाच्या परीक्षेत पेपरची कॉपी पकडल्याचा राग धरून विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार बुधवारी (दि. २५) सकाळी पावणेअकराच्या सुमारास येथील इंदापूर महाविद्यालयाच्या आवारात घडला. याप्रकरणी या प्राध्यापकाने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित विद्यार्थ्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्निल सुनील झगडे
(रा. झगडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रा. नानासाहेब विठ्ठल आवारे यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. ठाणे अंमलदार सहायक फौजदार दत्तात्रय यादव यांनी सांगितले, की आज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यानपरीक्षा केंद्रात स्वप्निल झगडे याच्याकडील पेपरची कॉपी पकडली. या कारणावरून रागावलेल्या स्वप्निल झगडे याने
प्रा. नानासाहेब आवारे यांना शिवीगाळ, दमदाटी करून कानशिलात भडकावली.
यापूर्वी इंदापूर महाविद्यालयात कधीही असा प्रकार घडला नव्हता. विशेष म्हणजे आरोपी असणाºया विद्यार्थ्याचे वडील वैद्यकीय व्यावसायिक आहेत. अशा सुशिक्षित कुटुंबातील विद्यार्थ्याकडून असा प्रकार व्हावा, याबाबत परिसरातून सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.