जयहिंद विद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:10 AM2021-02-14T04:10:31+5:302021-02-14T04:10:31+5:30
प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे ऑनलाईन आयोजन जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्रथम वर्ष ...
प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे ऑनलाईन आयोजन जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्रथम वर्ष विभागाकडून करण्यात आले होते. या वेळी संस्थापक कै. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संस्थेचे सचिव विजय गुंजाळ, संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रथम वर्ष विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचा झालेला प्रगतीचा आलेख, विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा तसेच विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती त्याबद्दल माहिती दिली.
प्राचार्य डॉक्टर डी. जे. गरकल यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधन करताना विद्यार्थी हा विविध गुणसंपन्न कसा होईल व ते गुण विद्यार्थ्यांना आत्मसात कसे होतील, विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य व नैतिकता कशी रुजवता येईल यासाठी महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. वैशाली धेडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक संपत गुंजाळ यांनी केले.
फोटो - जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना इंडक्शन कार्यक्रमानिमित्त संस्थापक कै. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक डी. एस. गल्हे.