रसिक श्रोत्यांना आनंद देणारे कार्यक्रम सुरू व्हावेत : प्रशांत दामले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:39+5:302021-07-05T04:08:39+5:30

पुणे : पुण्याला कलेचा खूप मोठा वारसा आहे. या भूमीत अनेक कलाकार घडले आहेत. कोरोनामुळे थांबलेल्या कलाकारांच्या गप्पा, कट्टा, ...

Programs that make the audience happy should start: Prashant Damle | रसिक श्रोत्यांना आनंद देणारे कार्यक्रम सुरू व्हावेत : प्रशांत दामले

रसिक श्रोत्यांना आनंद देणारे कार्यक्रम सुरू व्हावेत : प्रशांत दामले

Next

पुणे : पुण्याला कलेचा खूप मोठा वारसा आहे. या भूमीत अनेक कलाकार घडले आहेत. कोरोनामुळे थांबलेल्या कलाकारांच्या गप्पा, कट्टा, कला सादरीकरण पुन्हा एकदा लवकर सुरु व्हावे. रसिक श्रोत्यांना आनंद देणारे कार्यक्रम सुरु व्हावेत, अशी अपेक्षा अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. या कट्ट्यावर चित्रकला, गायन-वादन, गप्पांचे कार्यक्रम, कविसंमेलने रंगतील. तेव्हा हा नजारा पाहणे आल्हाददायी असेल असेही ते म्हणाले.

नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्या संकल्पनेतून नामदार गोपालकृष्ण गोखले चौकात (गुडलक चौक) उभारलेल्या कलाकार कट्टा व कलासंगम शिल्पाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अभिनेते-दिग्दर्शक प्रशांत दामले, पंडित संजीव अभ्यंकर, पंडितागुरु मनीषा साठे या दिग्गज कलाकारांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, डॉ. विनय थोरात, नगरसेविका नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी दिनकर गोजारे, उपअभियंता रवी खंदारे उपस्थित होते.

भाजप युवा मोर्चाच्या युवती अध्यक्षा प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. तर नगरसेविका नीलिमा खाडे यांनी आभार मानले.

-----------------------------------

असा आहे कलाकार कट्टा....

गोपालकृष्ण गोखले चौकातील उपलब्ध जागेत चित्रकला, नृत्यकला आणि चित्रपट या कलासंगम घडवून आणला असून, १० फूट उंचीचे तीन मेटल शिल्प उभारले आहेत. या शिल्पकलेमुळे पुण्यातील कलासंस्कृतीची माहिती या रस्त्याने ये-जा करणाऱ्या पुणेकरांना होणार आहे. या चौकात गुडलक हॉटेल असल्याने येथे अनेक दिग्गज कलाकारांचा राबता असायचा. याच गुडलक कॅफेसमोरील मोकळ्या जागेत कलाकार कट्टा उभारला आहे. विविध कलाकृती बसविण्यात आल्या आहेत. या व्यासपीठाचा वापर गप्पा करण्यासाठी, नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी होणार आहे.

---------------------------------------

Web Title: Programs that make the audience happy should start: Prashant Damle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.