जेजुरी, राजगडाच्या विकासाला गती

By Admin | Published: February 5, 2015 11:32 PM2015-02-05T23:32:17+5:302015-02-05T23:32:17+5:30

जिल्ह्यातील खंडोबा देवस्थान जेजुरी, भुलेश्वर देवस्थान (पुरंदर) व भोर येथील राजगड किल्ल्याच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे.

Progress to the development of Jejuri, Rajgad | जेजुरी, राजगडाच्या विकासाला गती

जेजुरी, राजगडाच्या विकासाला गती

खळद : जिल्ह्यातील खंडोबा देवस्थान जेजुरी, भुलेश्वर देवस्थान (पुरंदर) व भोर येथील राजगड किल्ल्याच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. वनक्षेत्रात करावयाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत या ठिकाणांसाठी सुमारे २ कोटी ३0 लाखांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
याबाबतचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. \जिल्ह्यातील तीनही कामे अतिशय महत्त्वाची आहेत. ही कामे करताना वनसंवर्धन कायदा १९८० चा भंग होणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचना वन विभागाला देण्यात आल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. (वार्ताहर)

जेजुरी खंडोबा देवस्थान ७५.६६ लाख
पाणवठे तयार करणे, सिमेंट टाक्या बांधणे, बालोद्यान, मंदिर परिसरात अंतर्गत रस्ते, उंच रोपांची लागवड, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, जागोजागी सूचना फलक बसवणे, कुंपण तयार करणे, सुरक्षारक्षक केबिन, बाकडी बसवणे, विद्युतीकरण करणे, पक्षी-प्राणी यांचे माहितीफलक बसवणे.

भुलेश्वर वनक्षेत्र
२३.३० लाख
पाणवठे तयार करणे, सिमेंट टाक्या बांधणे, लोखंडी गेट तयार करणे, मंदिराकडे येणाऱ्या दोन्ही रस्त्यावर झाडे लावण्यासाठी दुतर्फा भिंती बांधणे, झाडे लावणे, मार्गदर्शक फलक तयार करणे, ठिकठिकाणी ऐतिहासिक बाबींची माहिती लिहिणे, पक्षी व प्राणी यांचे फलक बसवणे.

राजगड किल्ला
१ कोटी ३२ लाख
तपासणी चौकी, पाउलवाट दुरुस्ती, रेलिंग बसवणे,
निवेदन फलक बसवणे, पक्षी-प्राण्यांची माहिती लिहिणे,
सिमेंट बाकडी बसवणे, मातीनाला बांध, चेकडॅम, लूज बोल्डर,
११ मीटरचा जलशोषक,
पाणवठे व अन्य नैसर्गिक निर्मितीची कामे.

Web Title: Progress to the development of Jejuri, Rajgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.