‘शिवसंग्राम’कडून पानसरे यांच्या हत्येचा निषेध

By admin | Published: February 22, 2015 12:33 AM2015-02-22T00:33:10+5:302015-02-22T00:33:10+5:30

शिवसंग्राम पक्षाच्या पुणे शहर-जिल्हा शाखेने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध केला आहे. शिवसंग्राम पक्षाने शनिवारी पत्रक प्रसिद्ध करून पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली.

Prohibition of the murder of Pansare by 'Shiv Sangram' | ‘शिवसंग्राम’कडून पानसरे यांच्या हत्येचा निषेध

‘शिवसंग्राम’कडून पानसरे यांच्या हत्येचा निषेध

Next

पुणे : शिवसंग्राम पक्षाच्या पुणे शहर-जिल्हा शाखेने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध केला आहे. शिवसंग्राम पक्षाने शनिवारी पत्रक प्रसिद्ध करून पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर पानसरेंचा जीव घेण्यात आला. समाजातून विवेकवाद संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते. आमचे विचार मान्य नसतील, तर तुम्हाला संपवून टाकू, अशा विकृत वृत्तीच्या लोकांनी ही हत्या घडवून आणली आहे. मात्र, व्यक्ती संपली तरी तिचे विचार अमर असतात. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना आणि या घटनेच्या सूत्रधारांना तत्काळ अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही ‘शिवसंग्राम’ने दिला आहे. पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ओंकारेश्वर मंदिराजवळ सुरू असलेल्या उपोषणाला या पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition of the murder of Pansare by 'Shiv Sangram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.