Pune: वेल्हा तालुक्यातील मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:04 PM2023-07-20T15:04:50+5:302023-07-20T15:05:46+5:30

या आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर होणार कारवाई

Prohibitory order issued in Madhe Ghat waterfall area in Velha taluka | Pune: वेल्हा तालुक्यातील मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Pune: वेल्हा तालुक्यातील मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

googlenewsNext

पुणे : वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील ६० दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी जारी केले आहे. 

हा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये २०० ते ३०० फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याच्या ठिकाणी असे कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर भारतीय दंड. संहिता १९०८  कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि वन अधिनियमातील अनुषंगिक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Prohibitory order issued in Madhe Ghat waterfall area in Velha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.