विधि अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:08 AM2017-08-06T00:08:30+5:302017-08-06T00:08:35+5:30

मुंबईसह अन्य काही विद्यापीठांचे पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर न झाल्याने, तीन वर्षांचे विधि अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबणीवर पडले आहेत.

Prolonged access to the course courses | विधि अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर

विधि अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर

Next

पुणे : मुंबईसह अन्य काही विद्यापीठांचे पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर न झाल्याने, तीन वर्षांचे विधि अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबणीवर पडले आहेत.
राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत राज्यात तीन व पाच वर्षे कालावधीच्या विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली, पण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले आहेत. मुंबई विद्यापीठासह अन्य काही विद्यापीठांचे पदवीचे काही निकाल जाहीर झालेले नाहीत. प्रवेशाची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या १५ हजार २२० जागा आहेत. प्रवेशासाठी राज्यभरातून २७ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी मेमध्ये सीईटी दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे वेध लागले आहेत.

Web Title: Prolonged access to the course courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.