महिलांना प्रोत्साहन द्या!
By admin | Published: July 12, 2016 01:31 AM2016-07-12T01:31:06+5:302016-07-12T01:31:06+5:30
महिलांकडे अनेक क्षमता असून त्यांना योग्य पद्धतीने वाव देण्याची आवश्यकता आहे. व्यवसाय क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढायला हवे त्यासाठी त्यांना सामाजिक
पुणे : महिलांकडे अनेक क्षमता असून त्यांना योग्य पद्धतीने वाव देण्याची आवश्यकता आहे. व्यवसाय क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढायला हवे त्यासाठी त्यांना सामाजिक, कौटुंबिक आणि इतरही सर्व स्तरावर प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. आदिती गोवित्रीकर यांनी व्यक्त केले.
प्रविण मसालेवाले चॅरीटेबल ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्योग जननी कमल पुरस्काराचे वितरण सोमवारी झाले. या सोहळ््यात त्या बोलत होत्या. उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या यशस्वी महिला उद्योजिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या १५व्या पुरस्कारप्रदान सोहळ््याप्रसंगी हुकुमचंद चोरडीया, राजकुमार चोरडीया, मधुबाला चोरडिया व्यासपीठावर उपस्थित होते.
राजकुमार चोरडीया यांनी प्रास्ताविक केले. ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. येत्या काळात दोन लाख विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य देणार असल्याचेही ते म्हणाले.
श्वेता चोरडीया यांनी स्वागत केले तर गौरी चोरडीया यांनी आभार मानले. सुमेधा योगेश यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)