युवा उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे
By Admin | Published: February 20, 2017 03:13 AM2017-02-20T03:13:47+5:302017-02-20T03:13:47+5:30
युवा उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी मदतीचा हात देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे काम कौतुकास्पद आहे, असे मत सिक्कीमचे
पुणे : युवा उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी मदतीचा हात देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे काम कौतुकास्पद आहे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
गौतम कोतवाल लिखित ‘न्यू अचिव्हर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन, ग्रीन वर्ल्ड क्लबचे उद्घाटन आणि ग्रीन वर्ल्ड पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी औंध येथे भीमसेन जोशी नाट्यगृहात पाटील बोलत होते.
या वेळी विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष संतसिंग मोखा यांना ग्रीन वर्ल्ड समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. विशाल कदरकर यांना युवा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी झेलम चौबळ, अभय गाडगीळ, रामदास माने, विवेक क्षीरसागर, प्रकाश कुतवळ, सुभाष मोहिते, अॅड.मिलिंद पवार, अविनाश इगवे, बसवराज बेन्नी उपस्थित होते. सोनल कोतवाल यांनी आभार मानले.