अधिकारी होण्यासाठी महापालिकेचे प्रोत्साहन
By admin | Published: January 1, 2015 01:20 AM2015-01-01T01:20:33+5:302015-01-01T01:20:33+5:30
महापालिकेच्या वतीने २०१५मध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महापालिकेच्या आणखी तीन अभ्यासिका सुरु करणार आहे.
पिंपरी : प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगाणाऱ्या विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्षात साकरण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेच्या वतीने २०१५मध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महापालिकेच्या आणखी तीन अभ्यासिका सुरु करणार आहे.
यापूर्वी महापालिकेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर येथे स्पर्धा परीक्षा केंद्र्र सुरू केले आहे. तिथे २५० विद्यार्थ्यांची अभ्यासाची व्यवस्था महापालिकेने केलेली आहे. येथे सुसज्य ग्रंथालय आणि चांगली बैठक व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. त्याच धर्तीवर शहराच्या इतर भागामध्येही तीन अभ्यासिका होणार आहेत. त्यामध्ये सांगवी व कासारवाडी येथील अभ्यासिकेचे काम पुर्णतत्वाकडे आहे. ही अभ्यासिका काही दिवसातच चालू होणार आहे. या दोन्ही ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची सोय करण्यात येणार आहे. तर मुलींसाठी ही स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. त्याच सुसज्य असे ग्रंथालयही येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
त्याच बरोबर चिंचवड येथेही अभ्यासिकेचे काम चालू होणार आहे. या ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची व्यवस्था असेल. या अभ्यासिकेच्या बांधकामाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शहरामध्ये विविध अभ्यासिका उपलब्ध असल्या तरी त्यामध्ये आकारण्यात येणारे शुल्क मात्र मोठ्या प्रमाणात आहे. ते विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. याचा विचार करुन महापालिकेने मोफत स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु करुन दिले आहे. त्याचा फायदा सध्या २५० विद्यार्थ्यांना होत आहे. तर त्यामध्ये अजून ३०० विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाणार आहे.
पालिकेने फक्त अभ्यासिकाच उपलब्ध करुन दिलेली नाही. तर त्या ठिकाणी ग्रंथालय सुरु केले आहे. सर्व संदर्भ ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामध्ये चार लाखाची पुस्तके ही खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुसज्य ग्रंथालय सुरुवातीच्या काळात उपलब्ध होणार आहे. त्यातच जसा स्पर्धा परिक्षांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्या प्रमाणात पुस्तकांचा पुरवठा होईल.
विद्यार्थ्यांना चांगल्या व मोकळ््या वातावरणात स्वतंत्र अभ्यास करता यावा, यासाठी प्रत्येक मुलाला स्वता:चा कप्पा देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ वा गोंगाटाविना त्यांना अभ्यास करता येणार आहे. मोकळी व खेळती हवा राहवी, यासाठी हॉलची व्यवस्थाही तशी करण्यात आली आहे.
अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये करिअर करायचे असते. मात्र, अनेकांना परिस्थितीअभावी हे करता येत नाही. सध्या शहराध्ये किंवा पुण्यामध्ये देखील स्पर्धा परिक्षांसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात येते. अनेक विद्यार्थी हे शुल्क भरु शकत नसल्यामुळे त्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडचणी येतात. शिकवणी वर्ग लावणे, तर दुरच पण अभ्यासासाठी अभ्यासिकेत जाणे परवडत नाही. शहरामध्ये अभ्यासिकेत महिन्यासाठी ४०० ते ७०० रुपये आकारले जातात. मात्र पालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
नविन होणाऱ्या अभ्यासिकांमध्येही दर महिन्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग घेतले जाणार आहेत. त्यामुळे अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी
समजून घेणे, स्पर्धा परिक्षांमध्ये असलेले प्रश्न व त्यावर कशा
प्रकारची उत्तरे अपेक्षित असतात, याची माहिती व मुलाखतीची तयारी कोणत्या प्रकारे करायची, याचे मार्गदर्शनही त्यांना तज्ज्ञाकडून मिळणार आहे. इतर कोणत्याही अभ्यासिकेमध्ये नसतील, इतक्या सुविधा पालिका विना मुल्य उपलब्ध करुन देणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना शहरातील स्पर्धा परिक्षा केंद्रावर अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारली जाते. गरीब विद्यार्थी ते भरू शकत नसल्याने महापालिकेने स्पर्धा परिक्षा केंद्र उभारले आहे. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. शहरातील तीनही अभ्यासिका लवकरात लवकर चालू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
- सुभाष माछरे, सहायक आयुक्त, पिं.-चिं. मनपा
४स्पर्धापरिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्य ग्रंथालय उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये दोन ग्रंथपाल असतील. महापालिकेने यासाठी निगडी येथील स्पर्धा परिक्षा केंद्रावर २५ लाखाचा खर्च केला आहे. तर सांगवी आणि कासारवाडी येथे १५ ते १६ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये निगडीमध्ये २ लाखाचे व या दोन्ही ठिकाणी २ लाखाचे पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
४राज्यातील पालिकेने केलेला पहिलाच प्रयोग
४६०० विद्यार्थ्यांची व्यवस्था; मुला-मुलींची स्वतंत्र व्यवस्था
४स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पुस्तकेही उपलब्ध
४प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला अधिकारी किंवा स्पर्धा परिक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
४विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र, मासिकेही उपलब्ध.