पोलीस महानिरीक्षकपदी शरद शेलार यांची पदोन्नती

By Admin | Published: January 6, 2017 06:27 AM2017-01-06T06:27:12+5:302017-01-06T06:27:12+5:30

ठाणे पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले शरद रामचंद्र शेलार यांना महाराष्ट्र शासनाने काल पदोन्नती दिली आहे

Promotion of Sharad Shelar as Police IG | पोलीस महानिरीक्षकपदी शरद शेलार यांची पदोन्नती

पोलीस महानिरीक्षकपदी शरद शेलार यांची पदोन्नती

googlenewsNext

पुणे : ठाणे पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले शरद रामचंद्र शेलार यांना महाराष्ट्र शासनाने काल पदोन्नती दिली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक या महत्त्वाच्या पदावर त्यांना नियुक्त केले आहे.
शेलार यांनी याअगोदर सातारा, रत्नागिरी, नांदेड, महामार्ग सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता, नाशिक, नवी मुंबई, पुणे रेल्वे, धुळे, नाशिक, नांदेड, मुंबई, ठाणे ग्रामीण, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना उत्तम कामगिरी बजावली आहे. खून, दरोडे, अपहरण, खंडणी अशा शेकडो गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची त्यांनी उकल केली आहे.
शेलार हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निर्वी गावचे रहिवासी असून, स्व. रामचंद्र बापूराव शेलार व सीता शेलार (ताई) यांचे सुपुत्र आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांचे मोठे बंधू किरण शेलार यांची पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात उरुळी कांचन, पुरंदर तालुक्यात परिंचे, इंदापूर तालुक्यात लासुर्णे (रयत शिक्षण संस्था), दौंड तालुक्यात यवत, शिरूर तालुक्यात न्हावरे, पुणे शहरात दोन्ही बंधूंचे शालेय शिक्षण झाले आहे.

Web Title: Promotion of Sharad Shelar as Police IG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.