प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By admin | Published: October 13, 2014 11:10 PM2014-10-13T23:10:06+5:302014-10-13T23:10:06+5:30
पदयात्र, शेकडो कार्यकत्र्यासह काढलेल्या दुचाकी रॅली, घोषणा आणि रिक्षातून दिवसभर सुरू असलेला प्रचार यामुळे आज दिवसभर जिल्हा दुमदुमून गेला होता.
Next
पुणो : पदयात्र, शेकडो कार्यकत्र्यासह काढलेल्या दुचाकी रॅली, घोषणा आणि रिक्षातून दिवसभर सुरू असलेला प्रचार यामुळे आज दिवसभर जिल्हा दुमदुमून गेला होता. सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपल्यावर आता उमेदवारांनी बुधवारी होणा:या मतदानासाठीच्या तयारीला सुरुवात केली आह़े
विधानसभेच्या निवडणुकीसाठी 1 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ख:या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली़ युती आणि आघाडी तुटल्याने यंदा प्रमुख पाच पक्षांचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात रिंगणात उतरल्याने उमेदवारांची संख्या वाढली होती़ त्यात दिवस कमी मिळाल्याने उमेदवारांनी पदयात्र, कोपरा सभेद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला होता़ सकाळी आणि सायंकाळी पदयात्रेद्वारे संपर्क, दुपारी छोटे, मोठे मेळावे, बैठका त्यानंतर रात्री पुन्हा मतदारसंघातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी यावर जवळपास सर्व प्रमुख उमेदवारांनी भर दिला होता़
प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी एकाच दिवसात मतदारसंघातील जास्तीत जास्त भागामध्ये पोहचण्यासाठी दुचाकी रॅली काढल्या़ जवळपास प्रत्येक उमेदवारांच्या रॅलीमध्ये शेकडोने कार्यकर्ते सहभागी झाले होत़े याबरोबरच रिक्षातून प्रचार केला जात होता़ प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी बुधवारी होणा:या मतदानासाठीच्या नियोजनावर भर देण्यास सुरुवात केली़ मतदान केंद्रांवर नेमलेल्या प्रतिनिधींचे पासेस त्यांच्यार्पयत पोहचविण्यास सुरुवात केली़ बुथप्रमुखांवर सोपविण्यात आलेली कामे पूर्ण झाली की नाही, याचा आढावा रात्री घेतला जात होता़ (प्रतिनिधी)
निवडणुकीत अधिक उमेदवार असल्याने चुरस वाढल्याने जास्तीतजास्त मतदारांर्पयत पोहचण्याचा व त्यांना आपले म्हणणो पटवून देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न होता़ अनेकांनी संपूर्ण मतदारसंघाच्या प्रचाराच्या दोन फे:या पूर्ण केल्या़