माओवादी समर्थकांविरोधात पुरावे - सतीश माथूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:00 AM2018-06-10T05:00:21+5:302018-06-10T05:00:21+5:30
एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या संशयितांचे माओवादी कारवायांशी संबंध असल्याचे ठोस पुरावे पोलिसांना राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी शनिवारी सांगितले.
पुणे - एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या संशयितांचे माओवादी कारवायांशी संबंध असल्याचे ठोस पुरावे पोलिसांना राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी शनिवारी सांगितले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाच्या आवारात येत असलेल्या नियोजित पोलीस पब्लिक स्कूलचे भूमिपूजन तसेच पाळणाघराचे उद्घाटन माथूर यांच्या हस्ते झाले़ यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते़
एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा हात असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे़ माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे देशातील मोठ्या राजकीय व्यक्तीला मारण्याचा कट माओवाद्यांनी आखल्याचे पोलिसांना हाती लागलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते़ ही पत्रे व्हायरल झाली आहेत़ पोलिसांची कारवाई संशयास्पद व राजकीय हेतूने केली जात असल्याची टीकाही होत आहे, याबाबत विचारले असता माथूर म्हणाले, पोलिसांकडून कोणालाही कुठलेही पत्र दिलेले नाही़ माओवाद्यांचे आपापसात संभाषण आणि संपर्क झाला आहे़ माओवाद्यांच्या समर्थकांकडूनच ती व्हायरल झाली असावीत़ याप्रकरणात पोलिसांना घरझडतीत मिळालेली कागदपत्रे व अन्य बाबींनंतरच पोलिसांनी ही कारवाई केली आहे़ त्याचा ठोस पुरावा पोलिसांकडे आहे़ कोणाला या कारवाईबाबत शंका असेल तर
आम्ही सर्व माहिती न्यायालयाला दिली आहे़ त्यांना न्यायालयात जाण्यास मुभा आहे़
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, असेही माथूर यांनी सांगितले.
एम ४ रायफलमधून मिनिटात ९५० राऊंट फायरची क्षमता
आरोपींकडील कागदपक्षांध्ये ‘एम ४ कार्बाइन’ रायफलचा उल्लेख आहे. कमी रुंदीची आणि वजनाने हलकी असलेली ही रायफल एका मिनिटांत ७०० ते ९५० राऊंड फायर करु शकते. गॅस आॅपरेट, इअर कोल्ड, लहान नळी, संकुचित स्टॉक आणि वाहून नेण्यासाठी काही पार्ट वेगळे करण्याची सोय, इनबिल्ड अक्सेसरी रेल, हाताळायला सोपी, विस्तारित रेंज, दिवसा किंवा रात्री सुमारे ६०० मीटरपर्यंतचे लक्ष्य ठिपण्याची क्षमता, असे या रायफलचे वैशिष्ट.
युनायटेट स्टेटमधील उदारमतवादी तोफा कायद्यांमुळे तेथील काही राज्यांमध्ये ही रायफल विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याठिकाणी तिच्या स्टॉक किटची कमीत ५२ हजार रुपये आहे.
संभाजी भिडेंच्या सभेवरून नाशिकमध्ये तणाव
नाशिक : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या रविवारच्या सभेला परवानगी न देण्याची मागणी पुरोगामी संघटनांनी केल्यानंतरही पोलिसांनी अनुमती दिल्याने शहरात तणाव आहे. सायंकाळी सहा वाजता वडांगळकर आश्रम येथे भिडे यांची जाहीर सभा होणार आहे. दोन दिवसांपूर्वी सीआयडीने कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. दंगलीप्रकरणी भिडे यांच्या अटकेची मागणी असून जाहीरसभेमुळे वातावरण कलूषित होईल, असे भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, छात्रभारती आदी संघटनांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना त्यांनी सभेला परवानगी न देण्याची मागणी केली होती.
अहमदनगरमध्येही संघर्ष
अहमदनगरमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता भिडे यांच्या होणाºया सभेला आंबेडकरवादी संघटनांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही विरोध केल्याने त्यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे़ भिडे शहरात आले तर मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम आहेत.